Tik Tok India आज आपण चीन मध्ये जन्मलेल्या टिकटॉक ची कहाणी जाणून घेणार आहोत indian new app like tiktok.
4G च्या जमान्यात 5G च्या स्पीड ने अनेक स्टार घडवणाऱ्या जमान्यात टिकटॉक चा जन्म झाला.
टिकटॉक ची कहाणी २०१४ मध्ये चीन मधल्या शंघाई शहरामध्ये सुरू झाली.
Alex Zhu आणि Luyu Yang मुद्दामच ही नावे आणि इंग्लिश मध्ये टाईप केलेली आहेत. कारण त्यांचा उच्चार करताना थोडी कसरत करावी लागेल.
असो हे दोन मित्र होते आणि एक दिवस चर्चा करत असताना त्यांना एक भन्नाट आयडिया सुचली. त्यांना शॉट व्हिडीओ बनवणाऱ्या ॲप्स ची कल्पना सुचली.
मग त्यांनी एक मोबाईल ॲप डेव्हलप केलं आणि त्याचं नाव दिलं म्युझिकली Musical.ly.
काही काळा मध्ये हे ॲप खूप प्रसिद्ध झालं, त्या मधल्या लीप सिंग lip sync फीचर मुळे लोकांनी या ॲप ला डोक्यावर घेतलं होतं.
प्रचंड लोकप्रियतेमुळे ByteDance या कंपनीची नजर Musical.ly वर पडली. ByteDance कंपनीने Musical.ly ला 1 बिलियन डॉलर ला विकत घेतले.
त्या कंपनीने त्याचं नामकरण केलं आणि मग टिकटॉक चा जन्म झाला.
मग काय दोन वर्षांमध्ये टिक टॉक ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. भारतातल्या तरुणाईने तर अक्षरशः डोक्यावर घेतलं.
आपल्या देशांमध्ये ४५ कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत आणि त्या ४५ कोटी स्मार्टफोन मधील तब्बल ३० कोटी स्मार्टफोन मध्ये टिकटॉक वापरत होते.
भारतामध्ये सगळ्यात जास्त डाऊनलोड होणार म्हणजे टिकटॉक हे अप्प होत.
टिक टॉक लोकप्रिय का झाल ?
पंधरा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम निर्माण झालं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं हे वापरण्यासाठी खूप सोपं म्हणजे युजर फ्रेंडली होतं.
ज्यांना इंटरनेट नावाचा शब्द सुद्धा माहित नव्हता त्यांनी इंटरनेटवर टिकटॉक च्या माध्यमातून पदार्पण केलं.
टिकटॉक मुळे लोकां मधल्या सुप्त गुणांना वाव मिळाला.
लपलेल्या सुप्त गुण जगासमोर उघड झाले. सिनेमा, नाटक टीव्ही सिरियल मधून शक्य होणार नाही ते टिकटॉक च्या माध्यमातून शक्य झाले.
आणि एका रात्रीतून अनेक स्टार निर्माण झाले, टिक टोक कोट्यवधी लोकांचे मनोरंजनाचे साधन झाले तर हजारो लोकांचे कमाईचा स्त्रोत झाले
टिक टोक मधून कमाई ?
प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर रातोरात लोक स्टार होत गेले नंतर त्यांचे फॉलोवर्स खूप वाढले.
काही स्टार्स चे फॉलोवर्स करोडो मध्ये होते. मग काय भारतातील मोठ्या कंपन्या त्या स्टारकडे जाहिराती साठी येऊ लागल्या आणि त्यांना जाहिरात करण्या साठी ऑफर देऊ लागल्या. मग हे स्टार करोडो रुपयांमध्ये कमाई करू लागले.
ज्यांनी टिक टोक वर कमाई सुरुवात केली होती ते लखपती झाले तर काही करोडपती झाले.
ज्यांचे फॉलॉवर दहा लाखा पेक्षा जास्त असायचे त्याच टिकटॉक स्टार्सना या मोठ्या कंपन्या ऑफर द्यायच्या.
Tik Tok India टिकटॉक चा परतीचा प्रवास
मग कालांतराने हे ॲप बदनाम व्हायला चालू झाले. मद्रास हायकोर्टाने यावरती बंदी आणली.
कारणही तसेच होते म्हणा Adalt content मुळे मद्रास कोर्टाने या वर बंदी आणली.
कालांतराने ही बंदी उठवली गेली. नंतर हे app भारतीय डेटा चोरी करून इतर देशांना पुरवतो अशी टीका झाली.
टिकटॉक वर ऍसिड अटॅक ला प्रोत्साहन देणारे काही व्हिडिओ अपलोड झाले आणि देशांमध्ये एकच टिकटॉक विरोधात लाट उसळली.
नुकताच कॅरीमिनाती च्या व्हिडिओ मुळे टिकटॉक विरोधात मोठा वाद निर्माण झाला होता.
तो निवळणार इतक्यातच भारत-चीन सीमेवर चीनने केलेल्या विघातक कृत्य. गलवान खोऱ्यामधील कारवाई नंतर भारतामध्ये टिकटॉक वर बंदी आणण्यासाठी संघर्ष पेटला.
आणि भारताने चीन च्या ५९ ॲप वर बंदी आणली आणि त्या यादीमध्ये टिकटॉक चे नाव होते.
यामुळे चीनवर खूप मोठा आर्थिक दबाव आला आहे.
indian new app like tiktok
आणि सध्या भारतामध्ये टिकटॉक ला पर्याय म्हणून खूप भारतीय aaps उपलब्ध आहेत
टिकटॉक ला पर्याय म्हणून भारतीय ॲप्स
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks