भारतामध्ये कोरोंना ची सुरुवात साधारणतः मार्च महिन्यामध्ये झाली, या मार्च महिन्यामध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना कोरोंना ची कॉलर ट्यून वाजवण्यास सुरुवात केली, सुरुवातीला एक माणूस भीतीदायक खोकतो, मग एका गोड आवाजात एक महिला बोलते ती म्हणजे करुणा ची कॉलर ट्यून, हे कॉलर ट्यून मार्च महिन्यामध्ये साधारणतः 22 तारखेपासून सर्व टेलिकॉम कंपन्यांनी वर ऐकू येऊ लागली, कालांतराने हे कॉलर ट्यून लोकांना खूप त्रासदायक वाटू लागले कारण पूर्ण कॉलर ट्यून ऐकल्यानंतर फोन लागत नसल्यास लोक चिडू लागले, पण सरकारने या कॉलर ट्यून मागचा उद्देश जनजागृती करणे हा होता. आज आम्ही या कॉलर ट्यून मागचा आवाज कोणाचा आहे ते सांगणार आहोत, सर्वप्रथम ही कॉलर ट्यून कशी बनवली जाते हे जाणून घेऊयात.
ivr म्हणजे ( Interactive voice response) इंटरॅक्टिव्ह वाईस ओवर रिस्पॉन्स असा होतो, याचा उपयोग रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, विविध टेलिकॉम कंपन्या, विमानतळे इत्यादी ठिकाणी केला जातो, महाराष्ट्राची लाडकी मेघना एरंडे सुद्धा हेच काम करते, तिचे विविध व्हिडीओ तुम्ही यु ट्यूब वरती किंवा व्हाट्सअप वरती बघितले असतीलच. असो कुठलीही कॉलर ट्यून तयार करत असताना अगोदर Interactive voice response आर्टिस्टला बोलवावे लागते, त्यांच्याकडून येऊन चा सराव करून घ्यावा लागतो, मग ती ठेवून रेकॉर्ड होते मग ती आपल्या नंबरला सेट होते,
पण या कोरोंना ट्यून साठी आवाज रेकॉर्ड केला गेलेला आहे जसलीन भल्ला या आर्टिस्ट चा, या अगोदरही तिने खूप कंपन्यांसाठी आपला आवाज रेकॉर्ड केला आहे, त्यामध्ये वोडाफोन, तिने काही पुस्तक सुद्धा आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेले आहेत.