History of Seat Belts कारच्या ज्या सीट बेल्ट ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले अशा सीट बेल्टचा रंजक इतिहास
प्रवास करताना तो सुखकर व्हावा आणि जरी आपघात झाला तरी डोक्याला किंवा ईतर ठिकाणी जास्त इजा होऊ नये म्हणून आपन कारचा सीट बेल्ट चा वापर करत असतो.
भरतातील आरोग्य विभागाच्या माहिती नुसार सीटबेल्ट न लावल्या मुळे मृत्यु झाल्यांची आकडेवारी सर्वात जास्त आहे.
एक ठराविक म्हणजे १३ ते ४५ वयो गटातील लोकांनी सीटबेल्ट लावणे आगदी महत्वाचे असते. कारण या गटातील लोकांचे मृत्यु चे प्रमाण जास्त आहे.
पण काधी तुम्ही वीचार केलाय का या जीव वाचवणाऱ्या सीटबेल्ट चा शोध कोणी आणि कधी लावला असेल?
तर ता लेखात आपण याचा रंजक इतीहास जाणून घेणार आहोत.
सीट बेल्ट चा शोध
History of Seat Belts या जीव वाचवणाऱ्या सीट बेल्ट चा शोध एका इंग्लिश इंजिनियरने लावला त्याचे नाव जॉर्ज केली George Cayley असे होते.
त्यावेळी या सीट बेल्टचा वापर फक्त पायलटस् ला आपल्या ग्लायडर्सला व्यवस्थित बांधून ठेवण्यासाठी केला जात होता.
परंतु या सीटबेल्ट चे पेटंट अजूनही एडवर्ड क्लेगहर्ग Edward J. Claghorn याचा नावावर च होते.
या सीट बेल्टचे पेटंट १० फेब्रुवारी १८८५ साली फाईल केल गेल आणि नंतर न्यूयॉर्क मध्ये याच सीटबेल्टचा वापर
टॅक्सीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांच्या आणि त्यासोबतच चालकाच्या सुरक्षेसाठी करण्यात आला. सुरुवातीच्या काळात
सीटबेल्टचा वापर मर्यादित स्वरूपात होत होता.
सीट बेल्टचा शोध १९ व्या शतकात लागून देखील याचा वापर मर्यादित स्वरूपातच होत होता.
अमेरिकेतील वाढते अपघात पाहून अमेरिकेतील फिजिशियन्स कडून वाहन कंपण्याना सीट बेल्टचा वापर वाढवण्या साठीआणि याचा विकासा साठी सूचना देण्यात आल्या.
१९५४ सालापासून Sports Car Club of America या संस्थेने आपल्या कार रायडर्सला सीटबेल्ट लावणे बंधन कारक केले.
त्याच सालच्या पुढच्या वर्षी Society of Automotive Engineers या संस्थेने Motor Vehicle Seat Belt Committee ची स्थापणा केली.
त्याच प्रमाणे पुढे रेस कार ड्रायव्हर्सला सीट बेल्ट लावने बंधनकारक करण्यात आले.
तेव्हापासूनच पुढे अनेक वर्ष रेस कार्स मध्ये सीट बेल्टचा वापर होऊ लागला.
बेल्ट बनवण्या मागचा उद्देश
परंतु सीट बेल्टच्या बाबतीत तेव्हा च बदल घडून आला जेव्हा एका स्वीडिश इंजिनीयर निल्स बोहलीन Nils Bohlin याने थ्री पॉईंट बेल्टची निर्मिती केली.
पण या बेल्टच्या निर्मितीच्या आधी हे सीट बेल्ट अगदी प्राथमिक दर्जाचे वाटत होते. त्यांना 2 point seat belt history टू पॉईंट सीट बेल्ट म्हणून ओळखले जायचे.
या बेल्ट चा उपयोग फक्त पोटला गुंडाळण्यासाठी होत होता. या 3 point seat belt history थ्री पॉईंट सीटबेल्टची निर्मिती वोल्वो या प्रसिद्ध वाहन कंपनीने केली होती.
हा सीट बेल्ट बनवण्या मागचा उद्देश वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचणे हा होता.
या सीटबेल्ट च्या वापराने वाहन चालवणाऱ्या च्या दोन्ही भागाचे रक्षण होणार होते. या सीट बेल्टची बनवण्या ची पद्धत खूप साधारण होती आणि त्याची डिझाईन ही खूप साधे होते. यामुळेच बाकीच्या कंपन्यांनीही हे लगेच विकत घेतले.
२००२ मध्ये जेंव्हा सीटबेल्ट बनवनाऱ्या बोहलिन यांचे निधन झाले तेंव्हा वोल्वो चा त्या सीटबेल्ट मुळे जगातील जवळजवळ १० हजार लोकांचे जीव वाचले होते.
सर्वात आधी अमेरिकेत या सीटबेल्ट वापरण्याची जनजागृती झाली. सीटबेल्टचा वापर अमेरिकेतील लोक मोट्या प्रमाणात करत होते.
त्या वेळेसच गाड्यांना सीटबेल्ट लावणे बंधन कारक केले सीटबेल्ट लावणे हा एक ड्रायव्हिंगचा नियमाचा एक भाग बनले.
या सीटबेल्टच्या वापरचा प्रचार जगभरात झाला आणि सर्व प्रकारचा गाड्या मध्ये सिट बेल्ट लावण्यात आले.
त्याच बरोबर फोर्ड या वाहन कंपनीने २००१ मध्ये एयर बाग असलेल्या सिटबेल्टची निर्मिती केली.
यामुळे अपघाताच्या वेळी हे सीटबेल्ट ईंन्फेक्ट होऊन या मुळे माणसाचा जीव वाचण्यास मदत होते. History of Seat Belts
२५ मार्च १९९४ नंतर भारतात ज्या गाड्या बनवण्यात आल्या त्या प्रतेक गाड्या मध्ये पुढचा सीटवर सिटबेल्ट ची निर्मिती करण्यात आली.
तसेच २००२ ला हाच नियम मागचा सिटसाठी ही लागू झाला. हा निर्णय भारतात आनंदाणे स्वीकारण्यात आला हा नियम देशभरात लागू झाला.
शहरी भागात या नियमाचे पालन काटेकोर पणे केले जाते त्यामुळे तेथील आपघातचे प्रमाण कमी झाले आहे.
पण अजूनही ग्रामीण भागात याचे नियम वापरत नसल्यामुळे तेथील आपघातातील प्रमाण कमी नाही झाले.