Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात नऊ वर्ष पाण्याने दिवा लावला जातो एक आश्चर्य आणि अद्भुत चमत्कार
आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. संध्याकाळ झाली कि आपण देवाला दिवा लावतो आणि त्यावेळेलाच दिव्याचे स्तोत्र म्हणतो.
कारण दिवा म्हणजे आंधराकडून प्रकाशा कडे नेणारा मार्ग आहे. सूर्याचे प्रतीक असणाऱ्या दिव्याला आपण वंदन करतो.
दिव्याला ओवाळूनच देवी देवताना आपण प्रसन्न करतो अशी श्रद्धा आहे.
“तिळाचे तेल, कापसाची वात दिवा जळो सारी रात”
दिवा लावण्यासाठी तेल आणि वात महत्वाचे असते या ओवीत सांगितले आहे.
इंधना शिवाय दिवा तेवत नाही पण आपन आज अशा एका मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत जेथे तेला शिवाय दिवा जळतो .
असे ऐकले तर आश्चर्य वाटेल कारण आजही संशोधक इंधनाला पर्याय शोधत आहेत.
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनेक देवी देवतांचे मंदिरे आहेत. त्यांचा वेगवेगळ्या अख्यायिका पण आहेत.
आज मात्र आपण अशाच एका छोट्या गावतील देवीच्या मंदीराबद्दल जाणून घेणार आहोत. हे गाव वसलेले आहे मध्य प्रदेशातील शाजापुर जिल्ह्यात गाडिया या नावाने.
ह्या गावातील कालीसिंध नावाच्या नदीच्या काठावर हे देवीचे मंदिर आहे. गाडिया घाटवाली माता का मंदिर म्हणून या मंदिराला ओळखले जाते.
असे तर सगळ्याच मंदिरा सारखे हे देखील एक मंदिर आहे. परंतु येथे नऊ वर्षांपूर्वी एक अकल्पित घटना घडलेली आहे.
त्यामुळे हे मंदिर अद्भुत आणि आश्चर्यकारक बनले.
साधारणतः सर्वच मंदिरा मध्ये दिवा तेवत असतो आणि तो तेलाचा किंवा तुपाचा असतो.
पण या मंदिरात मात्र दिवा लावला जातो तो पाण्याने.
हे नक्की काय आहे दैवी शक्ती की अंधश्रद्धा? याबद्दल आपण जाणून घेऊयात
मंदिरात व्हेल माशाच्या हाडची पूजा केली जाते
येथे आजही गाडिया घाटवाली माता का मंदिर मध्ये पाण्याने दिवा लावला जातो
येथील पुजारी सिंधु सिंह यांचे असे म्हणणे आहे की काही वर्षापूर्वी त्यांचा स्वप्नात प्रत्यक्षात देवीने दर्शन दिले.
त्यांना असे सांगितले की उद्या पासून मंदिरात दिवा लावताना तेल नाही तर काली सिंध नदीचा पाण्याने दिवा लावावा.
त्यांनी मग सांगितल्या प्रमाणे नदीचा पाण्याने दिवा प्रज्वलित केला. आश्चर्य पण तो दिवा खरोखरच प्रज्वलित झाला होता. असे तेथील पुजारी सांगतात.
खरे तर देवावर कितीही विश्वास असला तरी आशा अकल्पित घटनेवर विश्वास ठेवायला मन मानत नाही.
सिंधु सिंह यांचा या वर विश्वास बसत नव्हता ते घाबरले होते. त्यांनी घडलेली हकीकत गावकऱ्याना सांगितली. त्यांचा ही यावर विश्वास बसत नव्हता असे ते म्हणाले.
परंतु जेंव्हा गावातल्या लोकानी हे प्रत्यक्षात पाहिले तेंव्हा त्यांना हे आश्चर्य वाटले. गावात या चमत्काराची चर्चा होऊ लागली. आणि त्या वेळीच हे मंदिर प्रसिद्ध झाले.
या घटनेनंतर या Ghatiya Ghat Mata Mandir मंदिरातील दिवा कालीसिंध या नदीच्या पाण्यानेच पेटवला जाऊ लागला.
ही परंपरा आजही चालू आहे. दिव्यात पाणी घलताच एक तेलकट तरंग येतो आणि दिवा प्रज्वलित होतो.
पावसाळ्यानंतर दिवा परत प्रज्वलित केला जातो
पावसाळ्यात जेव्हा नदीची पातळी वाढते तेव्हा हे गाडिया घाटवाली माता का मंदिर मंदिर पाण्याखाली जाते आणि मग पावसाळा संपल्यानंतर शारदीय नवरात्र मध्ये हे मंदिर पुन्हा उघडले जाते आणि दिवा पेटवला जातो.
हा चमत्कार पाहण्यासाठी येथे आजूबाजूच्या गावातील लोक दर्शनासाठी येत असतात.
परंतु शारदीय नवरात्र मध्ये दर्शनासाठी खूप गर्दी झालेली असते. माणसांमध्ये श्रद्धा आहे म्हणून आपण अशा चमत्कारांवर विश्वास ठेवू शकतो की चमत्कार पाहूनच माणसाची श्रद्धा वाढीस लागते.
हे एक न उलगडलेले कोडेच आहे. परंतु एकविसाव्या शतकात अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात तेव्हा आपले मन शांशक होते.
आज देशभरामध्ये इंधनाची समस्या भेडसावत आहे कालीसिंध नदीच्या पाण्यात असे कोणते घटक आहेत जे ईनधनाचे काम करतात.
यावर संशोधन झाले तर माणसांचा समस्येचे उत्तर आपल्याला मिळेल.
भोपाळ पासून २०० कीमी अंतरावर हे गाडिया नावाचे गाव वसलेले आहे.
या गावातून कालीसिंध नदी वाहते आणि याच नदीवर हे चमत्कारीक गाडिया घाट माता मंदिर आहे.
तुम्हाला या चमत्कारिक गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता.