Black Pepper जो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते kali mirch धने-जिरे ववा, peppercorns आलं मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
Black Pepper
तसेच अधिक गुणकारी असा मसाल्यातिल एक पदार्थ काळी मिरी, यांचा उपयोग जेवण अधिक चांगले बनवण्यासाठी केला जातो.
त्याच्यात असणाऱ्या औषधी गुणधर्मा मुळे आजारांवरही उपयोग केला जातो. काळी मिरी अंटीबॅक्टरियल आणि ऑंटी व्हायरल आहे.
त्यामुळे ते अनेक शरीरातील असलेल्या जंतूंचा नाश करतात. काळी मिरी ही हृदयासाठी ही गुणकारी आहे.
पण याचा नियमित व योग्य उपयोग केल्याने हृदय रोगी बरा होऊ शकतो.
मलेरिया असणाऱ्यांन मिऱ्यांचे चूर्ण, तुळशीचा रस आणि मध एकत्र मिसळून घेतल्याने मलेरिया नाहीसा होतो.
जर जुनाट ताप असेल तर मिऱ्यांचा काढा घेतल्याने आराम मिळतो.
Kali Mirch
मिऱ्यांच चूर्ण, साखर आणि तूप हे एकत्रित करून चाटण घेतल्याने मेंदूतील उष्णता कमी होते तसेच चक्कर येणे भ्रम होणे यासारखे आजार बरे होतात.
लहान मुलांनाही मिरे, साखर, तूप दिल्यास त्यांची भूक वाढण्यास मदत होते आणि पोटाचे विकारही होत नाहीत.
अशक्त पणा ही दूर होतो तसेच काळी मिरी दिल्यामुळे त्यांची सर्दी नाहीशी होते. सर्दी मध्ये आले पेक्षा मिरे जास्त उपयुक्त ठरतात.
सध्या आलेल्या व्हायरस मुळे आपल्याला सर्दी खोकला या आजारांपासून लांब राहण्यासाठी काळी मिरी एक चांगले घरगुती औषध ठरेल.
कारण कसलाही खोकला आणि सर्दी मध्ये मिरे तूप मध हे एकत्र घेतल्यास खोकला बरा होतो.
कसल्याही प्रकारचा श्वासचा त्रास दम्याचा त्रास असल्यास दहा-पंधरा मिरे आणि थोडा मध याचे चाटण घेतल्यास दमा बरा होतो.
मिऱ्याचे चूर्ण हुंगल्याने भरपूर शिंका येतात त्यामुळे बेशुद्ध माणसाला मिरे हे चूर्ण हुंगायला दिल्यास त्याला भरपूर शिंका येतात आणि त्याची धुंदी उतरते.
मिरे, पिंपळी, सुंठ एकत्र करून चूर्ण बनवतात याला त्रिकुट चूर्ण म्हणतात हे चूर्ण कफ वात आणि पित्त या तिन्ही आजारांवर उपयुक्त ठरते.
निरोगी माणसाने सुद्धा रोजच्या आहारात त्रिकुट चूर्णचा वापर करावा.
Mouth Ulcers तोंड आलंय मग हे घरगुती सोपे उपाय करून बघा ..
मिरे रोगप्रतिकरक शक्ति वाढवतात संसर्ग पसरवणारे रोग स्वाईन फ्लू, लेटेस्ट व्हायरस कोरोंना यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आवश्यकता आहे.
त्यासाठी मिरे खाणे अतिशय उपयुक्त ठरते. अजून एक गोष्ट म्हणजे मिरे तुमचे वजन कमी करण्यासाठीही मदत करते.
रोजच्या आहारात वापर केल्यास आपल्या तोंडातील लाळेचे प्रमाण वाढते.
तसेच धमन्यांमधील वेग वाढतो आणि त्वचा तेजस्वी दिसते आणि आपल्या पोटांचा ऑर्गन्स ला चालना मिळते.
या मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, विटामिन ए, बी असल्यामुळे ते आपल्या शरीराला निरोगी ठेवतात.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काळी मिरी आपल्या रोजच्या वापरात ठेवल्याने सर्दी खोकला यांसारख्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो.
त्यामुळे रोज दोन तीन मिरे नक्की खा आणि आपली तब्येत चांगली ठेवा.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks