या कोरोना काळामध्ये भारतीय क्रिकेट वर्गाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण गेल्या दोन दिवसांमध्ये सलग दुसरा दौरा भारताला रद्द करावा लागला आहे. श्रीलंका दौरा रद्द केल्यानंतर आता परत एका देशाचा दौरा बीसीसीआयने रद्द केला आहे, अजूनही भारतीय संघाला सराव करण्यासाठी मुभा दिलेली नाही.

कुठल्याच खेळाडूला मैदानावर ती सराव करण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिलेली नाही. शुक्रवारी म्हणजे आज बीसीसीआयने झिम्बाव्बेचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ २४ जूनपासून श्रीलंकेमध्ये तीन ट्वेन्टी-२० आणि तीन वनडे सामने खेळणार होता आणि नंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये झिम्बाव्बेचा दौऱ्यावर जाणार होता पण या कठीण परिस्थितीत हा दौरा शक्य नाही म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाला खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, जर हा दौरा रद्द केला गेला तर श्रीलंके मध्ये खेळली जाणारी आयपीएल सुद्धा रद्द होईल असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
हा निर्णय म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खूप मोठा धक्का आहे, बऱ्याच लोकांनी श्रीलंका येथे जाण्याची तयारी केली होती, पण या निर्णयामुळे त्यांच्या सर्व नियोजनावर पाणी फिरले.