भारतामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा बाळगणारे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, पण अंधश्रद्धा बाळगत असताना खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये गुन्हे घडत असतात, कारण भोंदूगिरी हे त्याला कारणीभूत आहे. 2020 हे वर्ष कोरोना या महामारी ने गाजवलेले आहे, आणि याच काळामध्ये भोंदूगिरी करणारे महाराजांनी उच्छाद मांडला आहे,
अशीच एक घटना मध्य प्रदेशामध्ये घडली आहे. एक भोंदू बाबा आपल्या भक्तांच्या हाताचे चुंबन घेऊन भक्तांना बरे करतो, अशी अफवा सर्वत्र पसरवली गेली होती, आणि या अफवेला बरेचसे नागरिक बळी गेले होते, भक्तांची गर्दी त्या बाबांकडे येत होती, आणि याच काळामध्ये त्या भोंदूबाबाला कोरोना ची लागण झालेली, आणि या बाबा मुळे तेवीस भक्तांनाही कोरोना ची लागण झाली, हा बाबा मध्यप्रदेश मधल्या रतलाम मध्ये राहण्यास होता, तो आपल्या भक्तांच्या हातांचे चुंबन घ्यायचा, तावीज द्यायचा आणि यामुळे लोक आजारातून बरे होत होते असा दावा करण्यात येत आहे, अशा या भोंदूगिरी मुळे नाहक 23 जणांना कोरोना ची लागण झाली.
पण या बाबाचे कोरोना मुळे निधन झाले आणि आपल्या 23 भक्तांना कोरोना ची लागण करून गेला.