भारतामध्ये चित्रविचित्र गोष्टी नेहमी घडत असतात, या गोष्टी घडत असताना त्याचा प्रचार आणि प्रसार हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामध्ये भुताटकी, भानामती अशा गोष्टीचा प्रसार तर खूप मोठ्या प्रमाणात होतो, आणि आता तर इ जग असल्यामुळे समाज माध्यमाद्वारे कमी वेळात खूप मोठा प्रसार होतो.

प्रत्येक गावांमध्ये एक तरी असा म्हातारा असतो की ज्याने भूता सोबत कुस्ती खेळली आहे

अशीच खूप थापाडे लोक भारतामध्ये आहेत, भारतीयांचा आवडता छंद म्हणजे भुताच्या गोष्टी खूप रंगवून सांगणे, आणि लोकांना या काळा मध्ये तर या गोष्टींना अधिकच बळ मिळालं, कारण लोकांकडे प्रचंड असा वेळ होता, आणि तासन्तास लोक या गोष्टी रंगवत बसलेले होते. पण यातला बराच परिणाम छोट्या मुलांवर होतो याचं भान ठेवणे हे खूप गरजेचे आहे.

असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे, आणि नेहमीप्रमाणे या व्हिडिओचा संबंध सुद्धा भुताशी जोडला गेला आहे, हा व्हिडिओ आहे उत्तर प्रदेश च्या राणी झांसी पार्कमधली, तेथे एक ओपन जिम आहे, आणि त्या जिम वरती एक वर्कआउट करण्यासाठी मशीन आहे, त्यावर ती कोणी बसलेले नसतानासुद्धा ती आपोआप चालते. या व्हिडिओची भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली, प्रत्येक जण तो एकमेकांना व्हिडिओ फॉरवर्ड करत आहेत. पण समाजात असेही लोक असतात की गोष्टीच्या पाठीमागे काय कारण दडलेले आहे याचा छडा लावल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत.

आणि नंतर अशा लोकांनी या गोष्टीचा छडा लावला. कारण होतं की मशीन लुब्रिकेशन साठी त्यावर ग्रीस लावलं होतं आणि याच कारणामुळे या मशीन वरून वर्कआऊट करणारा उतरल्यानंतर ही ती चालू राहत होती. आणि याचा व्हिडिओ भुताटकी म्हणून व्हायरल झाला. यावर खूप मीम पण तयार झाली, म्हणतात की भुतांना पण कोरोंना ची लागण होते आणि त्यापासून वाचण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्या मशीन चा उपयोग भूत करतात.
मात्र या व्हिडिओने दिल्लीकरांचे चांगली झोप उडवली