भारतामध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर वाद निर्माण झालेले आहेत, अशा वादा मध्येच मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा ठिणगी पडली आहे, बॉलिवूडमधील कंगना राणावत हिने घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर अनेक दिग्गज पुढे येऊन तिला सपोर्ट करत आहेत. रविना टंडन, प्रकाश राज, अभिनव कश्यप अशा बड्या दिग्गजांनी या विरोधात आवाज उठवला. आणि समाज माध्यमातून त्यांना सपोर्ट पण मिळत आहे.

हे घराणेशाही फक्त हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे, मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा कट कारस्थान होत असतात. अशी टीका मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केली.

https://www.facebook.com/domkawla/videos/3539238672757456/

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करणारे दिग्गज हे फक्त आपले काम साध्य करण्यासाठी गोड बोलत असतात, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असा येते सांगतात महेश टिळेकर यांनाही मराठी गोष्टी मधून घालवून देऊ अशा बऱ्याच जणांनी धमक्या दिल्या त्यांचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांचं करिअर संपवण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, पण त्यांना न जुमानता ते आजही तग धरून उभे आहेत.

ते पुढे सांगतात मराठी तारका कार्यक्रमाचे कौतुक करायचं सोडून ते न होऊ देण्यासाठी अनेकजणांनी आडफाटे आणले. एकदा चित्रपट प्रदर्शनासाठी आला सर त्याच्या खोट्या अफवा पसरवायचे असा घाट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये घडतो

जो काय ड्रामा आहे तो फक्त हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसत नसून तो मराठी इंडस्ट्री मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पडतो, मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा घराणेशाही आहे.