हिंदू धर्मात विड्याचे पान याला अनन्य साधारण महत्व आहे. विड्याची पाने सर्वांनाच खायला खूप आवडतात. जेवणानंतर मुख वास म्हणून आपल्याकडे याचा वापर करतात.
तसेच ते धार्मिक विधीतही त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे . आपल्या कडील लोक विड्याचे पान खाण्याचे प्रचंड शौकीन आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
विड्याचे पान याला नागवेलीचे पान असेही म्हणतात. धर्मग्रंथांमध्ये ही विड्याच्या पानाचे धार्मिक महत्व सांगितले गेलेले आहे.
त्याचबरोबर आयुर्वेदिक दृष्ट्या विड्याचे पान आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये असलेले मिनरल्स, कॅल्शियम ,प्रोटीन्स नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर असतात.
त्याच प्रमाणे जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते. पान हे रक्त शुद्ध करते. त्यामुळे जेवणानंतर आपल्याकडे पाहुण्यांनाही पानाचा विडा खायला देतात.
घरामध्ये तुळस सुकून जात असेल तर हे उपाय करा
विड्याचे पान आणि त्याचा इतिहास
या पानाचा इतिहास असेही सांगतो की, नागवेलीची पाने ही फक्त हिमालया मध्ये सापडायचे.
हिमालया मध्ये या प्रकारच्या पानांची लागवड केली जात असे.
हिमालयातील लोकांचे असेही म्हणणे आहे की माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी पानाचे पहिले बीज हिमालयात रोवले.
तेव्हापासून या पानांची उत्पत्ती झाली.
भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याकडे मारुतीला ही पानांची माळ घातली जाते. याचीही एक कथा सांगितली जाते.
यावरून रामायण आणि महाभारत अशा कालखंडातही पानांचा उल्लेख आहे, हे दिसून येते.
जेव्हा सीतेचे हरण झाले होते. आणि त्यानंतर मारुती जेव्हा पहिल्यांदा माता सीतेला भेटायला गेले होते,
तेव्हा सीतेने भेट म्हणून मारुतीला त्या अशोक वनातील नागवेलीच्या पानांची माळ गळ्यात घातली होती.
तेव्हापासून आजही मारुतीच्या मंदिरात गेल्यास मारोतीचा गळ्यात पानांची माळ घालतात.
त्याचबरोबर महा भारतातही जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध संपल्यानंतर पांडवांचा विजय झाल्यावर पांडवांनी सर्वात मोठा अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले होते.
हा यज्ञ फक्त चक्रवर्ती सम्राट करत असे. या यज्ञासाठी अर्जुनाने नाग लोकात जाऊन ही विड्याची पाने आणली होती. असा उल्लेख जैमिणी अश्वमेध या पुस्तकात केलेला आहे .
भारतीय संस्कृतीत पानांना मंगलदायी म्हणूनही खूप महत्व आहे. तुळशीचे पान, बेलाचे, दूर्वा, या पाना बरोबरच विड्याच्या पानाचे ही खूप महत्त्व आहे.
कुठल्याही मंगलदायी प्रसंगी, लग्नसमारंभात किंवा घरातील पूजेला ही विड्याचे पानाचे खूप महत्त्व आहे. विड्याचे पान कलशाला लावून त्याची पूजा केली जाते.
याच प्रकारे या पानांना संस्कृतिक महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट ठरवल्यानंतर करार म्हणून हे विड्याची पाने एकमेकांना देण्याचे प्रथा होती .
Benefits of Betel Leaf विड्याचे पान खाण्याचे फायदे
विड्याचे पान आरोग्य दृष्ट्या खूप चांगले आहे.
त्यातील probiotics या घटका मुळे चांगले अन्न पचन होते. त्यामुळे पूर्वी पान, लवंग कात कुटून खायला सांगितले जायचे.
तोंडाच्या कुठल्याही विकारा साठी पान खूप गुणकारी आहे. मुख दुर्गंधी साठी पानाचा उपयोग करतात.
जर सकाळ संध्याकाळ पाण्याचे सेवन केले तर मुख दुर्गंधी समस्या नाहीशी होते. पान खाल्ल्याने गळा मोकळा होतो. आणि घसा मोकळा होतो.
त्यामुळे आपल्याकडील अनेक गायक लोकांना तुम्ही पान खाताना बघितले असेल. त्याचबरोबर पान खाल्ल्याने हिरड्यांवर आलेली सूज कमी होते.
सर्दी झालेली असेल किंवा घसा बसला असेल, कफ झालेला असेल तरीही प्रमाणात पान खाल्ल्यास फरक पडतो.
कात , चुना, सुपारी नागवेलीच्या पानावर ठेवून त्याची पुरचुंडी करून खाणे हा विड्याच्या पानाचा सगळ्यात सोपा प्रकार आहे.
परंतु आवडीप्रमाणे या पानांमध्ये काजूची पावडर, बदामाची पावडर, गुलकंद, सुंठ पावडर, जायफळ, सुपारी, बडीशोप, लवंग, मिरे, खोबर्याचा किस इत्यादी घालूनही पान बनवले जाते.
त्रयोदशगुणी विडा
त्रयोदशगुणी विडा हा भारतीय इतिहासात खूप प्रसिद्ध मानला जातो. हा विडा मुख्यत्वे करून तेरा पदार्थां पासून बनवला जातो.
त्यात सुपारी, बडीशोप, जायपत्री, लवंग, कात, केसर, खोबरे, खसखस, कापूर, ज्येष्ठमध, कंकोळ एवढी सगळी सामग्री घालून बनवला जातो.
भारतामध्ये असणाऱ्या प्रमुख देवस्थानांना विडयानेच नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. त्रयोदशगुणी विडा नैवेद्य अर्पण पणा साठी वापरला जातो.
यात सर्वात श्रीमंत असणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थानाचा ही समावेश होतो.
विड्याच्या पानांमध्ये कलकत्ता पान, बनारस पान, चॉकलेट पान, फायर पान असे अनेक प्रकार पाहायला मिळतात.