आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Super Women घरातल्या प्रतेक स्त्रियांना खूप जबाबदार्या असतात. घरातील स्त्री ही त्या घरचा स्तंभ असते. तिच्या वरच सगळ्या घरातील कामाचा शिवाय मुलांचा अभ्यास, त्यांचे संगोपन, घरातील वयस्कर माणसांची काळजी घेणे.
या बरोबरच बाहेरच पण काही जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे ती स्वतः कडे नकळत दुर्लक्ष करते.
या सुपर वूमन Super Women ची काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी ठरते.
आज कालचा युगात दुहेरी काम करते तिला तिचे करियर ही तितकेच महत्वाचे वाटते यामुळे ती थोडक्यात तारेवरची कसरत करते. असेच म्हणाव लागेल.
याचसाठी आज आपण या सुपर वूमन Super Women काळजी कशी घेतली पाहिजे या विषयीचा हा लेख आहे.
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचे सोपे मार्ग
Super Women साठी काही आरोग्य टिप्स
यातील आरोग्य टिप्स वापरुन आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. घरातील जबाबदाऱ्या पार पडण्याचा आनंदही घेऊ शकतो.
त्यासाठी आपली जीवनशैली स्मार्ट बनून आयुष्यात कुठल्याही वयात निरोगी राहण्याचा आनंद लुटू शकतो.
पोषक आहार/पोषण युक्त आहार
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर त्या राबत असतात. रात्री अंथरुणाला पाठ लावे पर्यंत त्यांची कामे संपत नाहीत. या सगळ्यात त्या स्वतःकडे आणि स्वतःच्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत.
परंतु हे छोटे आजार पुढे मोठ्या आजारांना निमंत्रण देतात.
आपले छंद आणि करिअर घरातील कामे या सर्वांमध्ये त्यांची खूप धावपळ होते. याच बरोबर खूप दम छाक होते. घरातील स्त्रिया पोषण तत्वे युक्त आहार घेत नाहीत.
शिळे अन्न वाया जाईल म्हणून ते न जात असले तरी संपवून टाकतात. तसेच सुकामेवा, फळे, ताजे आणि गरम अन्न आणि घरातील मुलांना आणि पुरुषांना देतात.
स्वतः जास्त खर्च होईल म्हणून खात नाहीत. जे असेल ते अन्न सर्वांना वाटून आणि स्वतःही ड्राय फ्रुट्स, फळे, ताजे अन्न, दूध, दही यासारखे पोषण युक्त आहार घेतला पाहिजे.
जर आजारी पडलं तर घर कोण सांभाळेल? त्यांच्यावरच घराचा तंबू उभारलेला असतो. त्यासाठी त्यांनी निरोगी राहणे खूप महत्त्वाचे असते.
आपल्या वया प्रमाणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम युक्त आहार किंवा कॅल्शियमच्या गोळ्या वेळच्या वेळी घ्याव्यात. तळलेली पदार्थ तसेच जंक फूड लोणचे पापड यांसारख्या पदार्थांची खाण्यात कमी वापर करावी.
यामुळे वजन आटोक्यात राहून होणारे आजार कमी होतात. आणि तुम्ही नक्कीच निरोगी रहाता.
नियमित व्यायाम
धावपळीच्या जीवनात आपल्या शरीरा कडे लक्ष दिले पाहिजे. आजकालच्या ऑफिस मध्ये तासंतास बसून काम करणारे स्त्रियांना शरीराची हालचाल करणारे कामे खूप कमी असतात. आणि त्याच मुळे वजन वाढणे अपचन यासारखे आजार होतात.
त्यामुळे स्त्रियांनी रोज दिवसात एक तास तरी स्वतःसाठी काढून व्यायाम करणे किंवा योग साधना करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे शरीर चांगली बनेल आणि ते निरोगी राहण्यास मदत होईल.
व्यायामाची शरीराला खूप गरज असते. यामुळे शरीर डिटॉक्स होते. अनावश्यक चरबी कमी होते. तसेच रक्ताभिसरण चांगले होऊन पचन क्रिया सुधारते.
आठवड्यातून तीन चार दिवस एक तास तरी व्यायाम, सायकलिंग, स्विमिंग, डान्सिंग, किंवा ट्रेकिंग नक्की करावी. स्वतःला तंदुरुस्त ठेवावे.
बाहेर जाताना उन्हात काळजी घेणे
बाहेर कडक उन्हात जात असताना स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडा. स्वतः जवळील स्कार्फ, गॉगल्स, किंवा टोपी यांचा वापर करावा. त्वचेचे आजार होण्या पासून स्वतःचा बचाव करावा.
त्वचेवर काहीही बदल घडून आल्यास किंवा त्वचेच्या काही तक्रारी वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. आणि त्याचा उपचार घ्यावा कारण त्वचेचे रोग लवकर बरे होत नसतात.
स्वतःसाठी वेळ काढणे
स्त्रियांचं वय कितीही असो त्यांच्यावर विविध जबाबदारी असतात. आई म्हणून बायको म्हणून किंवा मुलगी म्हणून आयुष्यभर त्यांच्या वरच्या जबाबदार्या कमी होत नसतात. या सर्वांचा परिणाम त्यांच्या शरीरावर तसे त्यांच्या मनावर होत असतो.
सतत त्या तनावा मध्ये राहत असतात. सतत काळजी चिंता यांनी त्या ग्रासलेले असतात. कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांची खूप ओढाताण होत असते. या सर्वांची व्यवस्था त्यांनी स्वतः करायला हवे आणि त्यातूनही स्वतःला वेळ द्यायला हवा.
काही क्षण अधून मधून स्वतःला रिलॅक्स द्यायला हवा. यासाठी आवडते संगीत ऐकणे, एखादा छंद जोपासणे तसेच मैत्रिणीला फोन करून गप्पा मारणे आणि बाहेर जाऊन एखादी चक्कर मारून येणे.
अशाप्रकारे वरील टिप्स फॉलो करून घरातील अशा आघाड्यांवर लढणाऱ्या स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
Khup mast mahiti ahe… Thank you…