Story of Bhishma Pitamah भारताच्या इतिहासामध्ये महाभारत हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे.
महा-भारतामध्ये एक महत्त्वाचे पात्र होते ते म्हणजे भीष्म पितामह, म्हणतात की भिष्म पिता महा चा जन्म गंगेतून झाला आहे.
पिता महा माता म्हणजे गंगा, गंगा नदीला अनुसरून खूप सार्या कथा पुराणात लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यातलीच एक आता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Story of Bhishma Pitamah
प्राचीन काळा मध्ये इश्वाकू वंशाचा एक राजा होऊन गेला त्याचे नाव महाभीष होते.
त्यांनी खूप मोठे मोठे यज्ञ करून स्वर्गलोक प्राप्त केले होते.
तो सर्वांमध्ये एका देवासारखा राहत होता. एकदा सर्व देव ऋषी मुनी आणि महाभीष राजा ब्रह्मदेवांच्या सेवेकरिता एकत्र आले होते.
त्यामध्ये गंगा सुद्धा होती. तेव्हा अचानक वारा सुटला आणि गंगेच्या अंगावरचे वस्त्र निसटले.
सर्वजणांनी आपली मान खाली घातली परंतु राजा महाभीष तिच्याकडे एकटक बघत राहिला.
हे बघून ब्रह्मदेवाला खूप राग आला त्यांनी त्या राजाला शाप दिला.
तू मृत्यु लोकी जन्म घेशील आणि तेथे जीवन जगत असताना गंगे मुळे तु नाराज होशील दुखी होशील आणि जेव्हा तू राग व्यक्त करशील तेव्हा तू शाप मुक्त होशील.
शाप
मग महाभीष राजाने मृत्यू लोकांमध्ये कुरु वंशाच्या शांतनुचा रूपामध्ये जन्म घेतला,
why jain don’t eat onion and garlic जैन समुदायातील लोक कांदा लसूण का खात नाही?
एकदा तो शिकारीच्या निमित्ताने गंगा नदीच्या किनारी आला.
तेव्हा त्याला एक सुंदर स्त्री दिसली ती म्हणजे गंगा होय.
राजा शांतनु तिच्यावर मोहित झाला आणि तिला लग्नाची मागणी घालू लागला तेव्हा, गंगा लग्नासाठी तयार झाली पण तिने अट घातली
जेव्हा हे राजा शांतनु ने तिला प्रश्न विचारले, कुठलीही गोष्ट करण्यापासून अडवले असता ती निघून जाईल अशी अट घातली.
गंगाने घातलेली अट
राजाने तिची अट मान्य केली आणि विवाह केला.
नंतर दोघेही सुखाने संसार करू लागले कालांतराने त्यांना सात पुत्र प्राप्त झाले. परंतु गंगेने सातही पुत्रांना गंगा नदीला अर्पण केले.
गंगेने केलेले हे क्रूर कृत्य पाहून शांतनु काही बोलला नाही कारण त्याने दिलेल्या वचनाची त्याला आठवण झाली.
नंतर त्यांना आठवा पुत्र प्राप्त झाला तेव्हाही गंगा नदीला अर्पण करण्यासाठी निघाले तेव्हा मात्र राजाने गंगेला विचारले की तू असं का करत आहेस आणि अडवले.
तेव्हा तिने उत्तर दिले की मी स्वर्गातील गंगा आहे आणि आठही पुत्रांना वशिष्ठ ऋषींनी शाप दिला होता,
त्यांना शापमुक्त करण्यासाठी मी हे गंगा नदीला अर्पण केले.
तिने आठव्या पुत्राला सोबत घेऊन ती शांतनु राजाला सोडून निघून गेली.
तो आठवा पुत्र म्हणजे पितामह भीष्म होय.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks