गुरुवारचे व्रत ( Thursday Vrat) केल्याने आर्थिक संकटातून वाचता येते.

पैशाची चणचण भासत असेल तर गुरुवारी करा हे उपाय आणि पैशाच्या तंगी पासून दुर रहा.

सध्याच्या काळात सर्वांनाच पैशाची चणचण भासत आहे. आज कालच्या महागाईच्या काळात कितीही कमवले तरी ते कमीच पडते.

ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय त्यांच्यासाठी गुरुवारी हे गुरुवारचे व्रत खालील उपाय केले असता त्यांची आर्थिक चणचण दूर होईल. 

एवढेच नाही तर हे उपाय केला तर घरामध्ये सुख शांती लाभेल. गुरवार हा ब्रहस्पती (गुरु)आणि विष्णूचा मानला जातो. त्या दिवशी या दोघांची पूजा करणे उपासना करणे शुभ मानले जाते.

गुरुवारी खाली दिलेले उपाय करून आपल्या आयुष्यातल्या आर्थिक चंचनीतून सुटका करा. 

गुरुवारचे व्रत केळीच्या झाडाची पूजा करा

दर गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून केळीच्या झाडाची पूजा करावी. केळीच्या झाडाची पूजा केली असता आर्थिक संकट कमी होते.

प्रथम केळीच्या झाडाला पाणी घालावे व नंतर हळद आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ वहावी. आणि झाडाला लाल धागा बांधवा. प्रदक्षिणा घालावी नमस्कार करावा.

Thursday Vrat
Thursday Vrat

पिवळ्या वस्तू दान करावेत

गुरवारी शक्य असल्यास जास्तीत पिवळ्या वस्तूंचे दान करावे. या दिवशी पिवळ्या वस्तु दान करणे शुभ मानले जाते.

पिवळा रंग गुरुशी निगडीत आहे असे केल्याने आर्थिक गोष्टींचा त्रास कमी होतो.

Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे

तुळशित दूध अर्पण करणे 

तुळस विष्णूची आवडती आहे. गुरवार हा विष्णूचा दिवस मानला जातो. म्हणून तुम्ही मनापासून पूजा करून तुळशीत दूध अर्पण करावे. यामुळे पैशाची हानी कमी होते. 

गुरवारची गुरु ग्रह कथा वाचावी

आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होण्या साठी गुरु ग्रह व्रत कथा वाचावी. ही कथा वाचन्या पूर्वी त्या कथा पुस्तकाची पूजा करावी. पूर्ण कथा वाचल्या नंतर ऊं बृं ब्राहस्पतेय नम: या मंत्राचे ११ वेळा किंवा २१ वेळा जप करावा.

गुरुवारचे व्रत (Thursday Vrat) करावे 

सलग ११ गुरुवारी व्रत ठेवावे व उपवास करावा. या दिवशी फक्त पिवळे वस्त्र परिधान करावे. आणि पिवळे अन्न खावे कपाळाला हळदीचा गंध लावावा तसेच या उपवासला तुम्ही रात्रीचा वेळी गोड पदार्थाचे सेवन करू शकता.

त्या देवशी केळी चे सेवन वर्ज आहे त्यामुळे केळि खाणार नाही न याची काळजी घ्यावी. 

या दिवशी हळदीने आंघोळ करा 

गुरुवारी सकाळी आंघोळीचा पाण्यात थोडीशी हळद घालून आंघोळ करावी आणि पिवळे वस्त्र परधान करावे.

वर दिलेले गुरुवारचे व्रत उपाय करावेत.आणि आर्थिक संकटातून आपली मुक्तता करावी. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रह भारी आहेत त्यांनी ही हे उपाय करू शकतात.