सुशांत सिंग राजपूत याचा जन्म 21 जानेवारी 1980 रोजी झाला, त्याने यशाच्या शिखरावर जाण्याअगोदर आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरीयल मधून केली, 2008 साली आलेल्या स्टार प्लस वरील सिरियल मध्ये त्याने काम करायला सुरुवात केली त्या सिरीयल चे नाव होते “किस देश मे है मेरा दिल” नंतर त्याने 2009 साली झी टीव्हीच्या पवित्र रिश्ता या खूप गाजलेल्या सिरीयल मध्ये काम केले, नंतर खूप कामे भेटू लागली, 2013 साली  त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले,  त्याचा पहिला चित्रपट  Kai Po Che! हा होता. नंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स,  पिके, एम एस धोनी, केदारनाथ  आणि चीचोरे  या  सिनेमांमध्ये  प्रमुख भूमिका साकारल्या,

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येने पूर्ण भारत हादरला, त्याचं नेमकं कारण अजूनही समजलेले नाही परंतु टीव्ही आणि समाज माध्यमे तर्कवितर्क लावत आहेत. काहीजण म्हणतात त्याच आणि त्याच्या गर्लफ्रेंडच जमत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, आता टीव्ही आणि समाज माध्यमांमध्ये खूप मोठे संशोधन कार येथील आणि आपापले विचार मांडायला सुरूवात करतील.

सुशांत सिंग राजपूत चा मोठा चाहता वर्ग आहे, असे बरेच चित्रपट गाजलेले आहेत नुकताच आलेला चीचोरे हा चित्रपट खुप गाजला होता, या चित्रपटात त्याने कसल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला पाहिजे आणि यावर आत्महत्या हा पर्याय नाही. हे सगळ्या प्रेक्षकांना पटवून दिलं आणि उलट त्यानेच आत्महत्या केली. हे खूप चटका लावून जाणारी गोष्ट आहे.

चित्रपट विश्व आणि खाजगी जीवन या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा आणि आपल्या जीवनाचा काहीही संबंध नसतो तरी पण चित्रपट बघून काही महाभाग चित्रपटांमधील पात्रा सारखं वागायचा प्रयत्न करतात आणि फसतात.