बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या म्हणीप्रमाणे आपण आपल्या बालपणीच्या जुन्या आठवणी मध्ये रमून जातो, धावपळीच्या जीवनामध्ये बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी वेळ नाही, पण निसर्गाने जी महामारीची किमया घडवली त्याच्यामुळे सध्या सर्वत्र वेळ आहे, बालपण म्हटलं की शाळा आलीच, शाळेमधील धमाल गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला तर खूप जुन्या गोष्टीचा उलगडा होईल,

तशीच आठवण म्हणजे शाळेतील शिक्षक, प्रत्येक शिक्षकांची एक वेगळी विशेष बाब असायची, प्रत्येक शिक्षक शिकवताना आपली शैली वापरायचे, त्याच शैलीमध्ये त्यांचे डायलॉग असायचे, आणि ते डायलॉग्स आठवले की चेहऱ्यावर अजूनही स्मित हास्य येत, तर चला आठवूया बालपणीच्या शाळेतील शिक्षकांचे डायलॉग्स.

मराठवाड्यातील शाळेतील शिक्षकांचे डायलॉग्स

1 “काय गोष्ट आहे खूप खसखस पिकल्याय आम्हाला पण सांगा थोड”

२ “खायचं प्यायचं, आंघोळ करायचं बरं लक्षात आहे, आणि होमवर्क मला लक्षात नाही”

३ “वर्गाला एकदम आठवड्याचा बाजार बनवून टाकला”

४ “एक काम करा पहिले सगळे तुमचे बोलून घ्या नंतर बोलणं झाल्यास मला सांगा मग मी शिकवायला चालू करतो. “

५ “हा इंग्लिश चा वर्ग आहे टॉक इन इंग्लिश ओन्ली”

६ ”हिन्दी की कक्षा में हिन्दी भाषा में ही वार्तालाप करें, एक बार में क्यूं नहीं समझ आता तुम लोगों को”

अशी खूप सारे डायलॉग आहेत जे की आम्ही कधीच विसरू शकत नाही