मावलीनॉन्ग ( Mawlynnong) देवाची बाग
मावलीनॉन्ग या गाबाची कथा ब्रह्मदेवाला पडलेले एक स्वप्न म्हणून आपण कोकणा कडे बघतो. कारण तिथला रम्य परिसर, डोळ्यांमध्ये राहणाऱ्या निसर्ग चित्र असे अनेक कारणे आहेत.
आज आम्ही देवाची बाग म्हणजे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गावात विषयी सांगणार आहोत. म्हणतात आरोग्य धन संपदा या तीन गोष्टी ज्या ठिकाणी आहेत तेथील माणूस सदा सर्वदा सुखी असतो.
आणि या तीन गोष्टी फक्त अशा ठिकाणी असतात ज्या ठिकाणी स्वच्छता असते.
आपण आत्तापर्यंत बघितले आहे की स्वच्छ गावाला पुरस्कार भारतीय सरकारने दिलेले आहेत. चला जाणून घेऊया भारतामध्ये सगळ्यात स्वच्छ गावाबद्दल, हे गाव भारतामधील ईशान्य भागात आहे म्हणजे मेघालय मध्ये आहे.
या मुस्लिम देशात रोज नियमाने गणपतीची पूजा करतात
मावलीनॉन्ग ( Mawlynnong) पृथ्वी वरील स्वर्ग
त्या गावाचे नाव मावलीनॉन्ग Mawlynnong आहे. जेव्हा तुम्ही हे गाव बघाल तेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपण स्वर्गामध्ये आलो आहोत..
प्रश्न पडेल स्वर्ग ज्याला म्हणतात ते हेच का ?
भारत सरकारने स्वच्छता राखण्यासाठी बरेच उपक्रम राबवले. सरकारला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.
पण या मावलीनॉन्ग जे करून दाखवले आहे ते आत्तापर्यंत कोणाला शक्य झालेली नाही.
या awlynnong village ला 2003 मध्ये आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळख मिळाली. या गावातील दक्ष नागरिकांनी स्वतः स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतल्यामुळे हे सर्व साध्य झालं.
भारताचा ईशान्य भाग म्हटला की पावसाळा हा ऋतु तेथे एकदम आनंददायक असतो.
आणि या काळात Mawlynnong गावा मध्ये फेरफटका मारला असता तुम्हाला पृथ्वीवरील स्वर्ग तुमच्या डोळ्यांनी बघायला मिळेल.
श्रावण महिन्यामध्ये तर प्रत्येक सन या गावांमध्ये साजरे केले जातात. आणि हे बघण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या संख्येने या गावांमध्ये येत असतात.
मावलीनॉन्ग आदर्श गाव स्वच्छतेचा अभ्यास करण्याजोगे आहे. या गावातील प्रत्येक घरांमध्ये 2007 साला पासून शौचालय आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या गावांमध्ये धुम्रपान आणि प्लास्टिक या दोन गोष्टीला कडकडीत विरोध आहे. जर कोणी धूम्रपान किंवा प्लास्टिकचा वापर करताना दिसला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते.
गावातील शक्यतो घरे बांबूचे बनवलेले आहेत. तेथे प्रत्येक वस्तू ही टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेली आहे.
या अशा बर्याच कारणांमुळे या गावाला वर्ल्ड हेरिटेज साईट चा दर्जा जागतिक संघटनेने दिलेला आहे.
मावलीनॉन्ग मध्ये प्रदूषणाला थारा नाही. या गावात आल्यानंतर आकाश नेहमी तुम्हाला निरभ्र दिसेल.
मावलीनॉन्ग हे गाव भारत – बांगलादेश बॉर्डरवर आहे. त्यामुळे बांगलादेश मधील काही परिसर या गावातून डोळ्यांनी दिसू शकतो.
या गावांमध्ये जाण्यासाठी दहा रुपये एंट्री फी आहे. पण हे दहा रुपये खर्चून आपण एक स्वर्ग आपल्या डोळ्यांनी बघू शकतो.
या गावांमध्ये एक विशेष बघायला मिळतं. या गावातील मुलं वडिलांचे नाव आपल्या नावापुढे लावत नाही तर आईचे नाव लावतात.
जर जीवनामध्ये स्वर्ग बघायचा असेल तर नक्की या मावलीनॉन्ग ला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे.