आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
मनामध्ये जर काही इच्छा असतील कुणा विषयी काही करण्याची आवड असेल तर त्याला प्रयत्न केले असता ते पूर्ण करण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. आज आम्ही अशाच एका महान व्यक्ती विषय सांगणार आहोत, त्यांनी समाजकार्य आणि भूतदया दाखवली. आणि यांच्या कार्याची दखल कर्नाटक सरकारने घेतली आणि नुकत्याच झालेल्या मन की बात मध्ये आपल्या प्रधानमंत्री त्यांच्या कार्याचा उल्लेख केला.
कोण आहेत कामेगौडा?
कर्नाटकात राज्यातील 84 वर्षीय ( KameGowda) कामेगौडा हे सध्या तलावमॅन म्हणून ओळखले जातात. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या भागातील एकही प्राणी किंवा पक्षी तहानेने व्याकूळ होऊन मरायला नाही पाहिजे. यासाठी त्यांनी सोळा तलाव एकट्याने बांधले आहेत. आणि त्यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांच्या परिवहन मंडळातर्फे जीवनभर फुकट प्रवास करायची सुविधा उपलब्ध केली आहे.
मन की बात मध्ये कार्याची दखल
नदीचे पाणी डोंगर-दऱ्या वरून वाहत येणारे पाणी फुकट वाया जाते आणि गरजवांता पर्यन्त पोहोचत नाही. म्हणून कामेगौडा यांनी बऱ्याच वर्षापासून एकटेच तलाव बांधायचे काम हाती घेतले आणि त्यांच्या कार्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुद्धा घेतली त्यांच्या मन की बात या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख केला.आणि त्यांना केलेल्या कामाची पोचपावती मिळाली