shani pradosh vrat katha आज आपण शनि प्रदोष व्रत कथा चे महत्व जाणून घेणार आहोत. प्रदोष महिन्यातून दोन वेळा येतो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष त्रयोदशीला शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हणतात.

शनि प्रदोष चे महत्व

या व्रताचे खूप महत्त्व आहे यामध्ये भगवान शिव शंकराची पूजा आराधना केली जाते. 

शनिप्रदोष केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट नाहीसे होतात. त्याचबरोबर हे व्रत केल्याने संतान प्राप्ती होते दारिद्र्य दूर होते आणि आपल्या आयुष्यात सुख प्राप्ती होते.

भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी शनी प्रदोष व्रत केले जाते. भगवान शिव हे व्रत करणाऱ्याचे शनीच्या वक्रदृष्टी पासून रक्षण करते आणि त्यांच्यावर शनिची कृपा राहते.

हा उपवास दरवर्षी येतो. भगवान शंकराची आपल्यावर चांगली कृपा राहण्यासाठी सर्वांनीच हा उपवास केला पाहिजे.

शनि प्रदोष व्रत पूजा मुहूर्त

18 सप्टेंबर 2021 शनिवार, सकाळी 06:54 वाजता सुरु होतोय आणि 19 सप्टेंबर 2021 रविवार 05:59 वाजता समाप्त होत आहे

आपल्याकडे शनी प्रदोषाचे महत्व सांगताना असेही सांगितले जाते की हा उपवास केल्यावर भगवान शंकराची पूजा करताना पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने याचा अधिक लाभ होतो.

त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांचे आशीर्वाद आपल्यावर नेहमीसाठी राहतो. याच बरोबर पुराणात शनिप्रदोषा चे व्रतकथा सांगितलेली आहे. 

Shani Pradosh Vrat Katha

एक धनवान शेट होता त्याच्याकडे धनसंपत्ती अमाप होती.

परंतु संतान अभावामुळे शेट आणि त्याची पत्नी नेहमी दुखी असायचे.

या सगळ्याला कंटाळून त्यांनी एक निर्णय घेतला की आपण दोघेही तीर्थयात्रेला जाऊ जात असताना त्यांना वाटे मध्ये एक संन्यासी भेटले.

त्या संन्यासाला शेट आणि त्यांच्या पत्नीने आपले दुःख सांगितले तेव्हा त्यांनी दोघांनाही शनिप्रदोष हे व्रत करण्यासाठी सांगितले.

तसेच त्या व्रताची चा विधि आणि त्याचे महत्त्व पटवून दिले त्या दिवसापासून शेट आणि त्यांच्या पत्नीने हे व्रत करण्यास सुरुवात केली असता भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना एक पुत्र प्राप्ति झाली. 

शनि प्रदोष केल्याने आपल्या संसारात असलेल्या संकटे दुःख हळूहळू दोर होऊ लागतात .. 

शनिप्रदोषचे उपवास, विधी, पूजनशनिप्रदोषा च्या दिवशी दिवसभर निराहार उपवास करणे.

सायंकाळी प्रदोष स्थितीला स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून भगवान शिव शंकराच्या मूर्तीचे विधियुक्त पूजन करणे

Shani Pradosh Vrat katha
Shani Pradosh Vrat katha

त्याचबरोबर देवाला धुपारती नेवेद्य दाखवून रात्री अन्नग्रहण करून उपवास सोडणे.

हे व्रत मनापासून आणि शिव शंकराचे स्मरण करून केल्यावर निश्चितच आपल्याला भगवान शंकर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यातील संकटे नष्ट करून शनी देवाची आपल्यावर सदैव कृपा राहील

How Many Religions are there in India | भारतात किती धर्म आहेत

ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदेवाचा वाईट प्रभाव आहे त्यांनी हे वृत्त केल्याने शनीदेवाची चांगली दृष्टी त्यांच्यावर राहील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम