why jain don’t eat onion and garlic
जैन समुदायातील लोक कांदा लसूण का खात नाही? जाणून घेऊयात ..
जगामध्ये विविध धर्माचे जातीचे तसेच समुदायाचे लोक राहत असतात .
प्रत्येक धर्मात कुठल्यान कुठल्या ठराविक प्रथा रूढी असतात. तसेच वेशभूषा, खानपान आणि पोशाख यात धर्माधर्मात वेगवेगळेपना पाहिला मिळतो.
परंतु संपूर्ण भारतात “अहिंसा परमो धर्म “ हा मंत्र जपलेला दिसतो. अनेक धर्म, पंथ शाकाहारी आहेत.
खाण्या पिण्याच्या बाबतीत काही धर्मातील नियमात साधर्म्य असलेले दिसून येते.
जसे हिंदू धर्मात आणि जैन धर्मात कांदा लसूण ही दोन पदार्थ वर्ज सांगितले आहे.
परंतु आजकाल हे नियम कोणी काटेकोरपणे पाळत नसले तरी ज्या लोकांच्या प्रथा परंपरांवर विश्वास आहे ते लोक हे नियम काटेकोर पणे पाळताना दिसतात.
या धर्मात कांदा आणि लसूण न खाण्याची नेमकी काय कारण असावीत.
जैन धर्मातील काही लोक आयुष्यभर या गोष्टी जेवणातून वर्ज्य करतात.
अर्थातच या मागे काही कारण आहे आणि ते म्हणजे जैन धर्मातील लोकांना कुठल्याही प्रकारची हिंसा करणे माहीत नाही.
या धर्माची स्थापनाच मुळातच अहिंसा आणि अध्यात्म या तत्वावर झालेली आहे.
अहिंसा ही या धर्मियांचे मूळ तत्व असल्या कारणाने या लोकांमध्ये मांसाहार करणे शक्यच नाही.
जैन मंदिरात देखील अहिंसा परमो धर्म “ असे वाक्य लिहिले असते, त्यामुळे अहिंसा ही त्यांच्या आहारात देखील दिसून येत नाही.
फक्त जैन लोकच नाही तर वैष्णव धर्मातील लोकही कांदा लसूण आपल्या जेवणात वापरत नाहीत.
याचे सर्वांचे मूळ कारण एकच आहे बाकी सर्वांचे आपले आपले स्पष्टीकरण दिलेली असतात.
वैदिक शास्त्रात किंवा जैनानचे गुरु महावीर यांनी अध्यात्मप्राप्ती साठी किंवा भगवंत मिळवण्यासाठी माणसाने सात्विक राहणे खूप आवश्यक आहे.
सात्विक म्हणजे काय तर थोडक्यात रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या तीन गुणांमध्ये सर्वश्रेष्ट सत्वगुण मानला जातो.
या गुणाची वृद्धी अनेक आचरण स्वीकारल्याने होते. आणि त्या पैकीच एक सात्विक भोजन मांनसातील सात्विक गुण विकसित होऊन मनुष्य सात्विक साधक होतो.
why jain don’t eat onion and garlic आहाराचा खूप मोठा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो.
म्हणून असे म्हंटले जाते की तुमचा आहार तामसिक असेल तर तुमची वृत्ती तामसिक आणि तुम्ही सात्विक आहार घेत असाल तर तुमची वृत्ती सात्विक होते.
कांदा आणि लसूण ही पदार्थ खाल्याने मानसातील काम वासना किंवा काम वृत्ती वाढीला लागते.
याच कारणाने मनुष्य अपप्रवृत्तीच्या मार्गी जातो. याशिवाय कांदा लसूण खाल्ल्याने मानसातील राग किंवा क्रोध वाढतो. जो वाढल्यास त्याला नुकसानच होते.
Sanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात
अध्यात्म मार्गात क्रोधाला जागा नाही यामुळे कांदा लसूण खाणे वर्ज्य मानले जाते .
याशिवाय कांदा आणि लसूण खाल्याणे शरीरातील उष्णता वाढते, आणि शरीरावर याचे वाईट परिणाम होतो.
जैन धर्मात याच सर्व कारणासाठी महावीराणी कांदा लसूण तसेच तामसिक अन्न ग्रहण न करण्याचा सल्ला दिला आहे.
या उलट सात्विक आणि शुद्ध आहार त्याच बरोबत अहिंसा चांगले आचरण या गोष्टींवर भर दिलेला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम