राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा.
मनोरंजन क्षेत्रातील तीन बड्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव, विनोदी गायिका सुगंधा मिश्रा आणि नर्तक-निर्माता रेमो डिसूझा यांना पाकिस्तानातून धमकीचा मेल आला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोरंजन क्षेत्राशी निगडीत तीन नावं रेमो डिसूझा, कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि राजपाल यादव यांना वेगवेगळ्या दिवशी ईमेलद्वारे धमक्या आल्या आहेत. राजपाल यादवच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ही धमकी कलाकारांना देण्यात आली होती
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव बिष्णू असल्याचे सांगितले. मेलमध्ये असे लिहिले आहे की, “आम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीचे निरीक्षण करत आहोत आणि तुमच्या माहितीत सांगू इच्छितो की हा पब्लिसिटी स्टंट नाही. संपूर्ण गोपनीयता आणि गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला ही धमकी पाठवत आहोत, असे मेलमध्ये लिहिले होते. आम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनावर देखील प्रभाव टाकू शकतो.
8 तासांत उत्तर मागितले
मेलमध्ये पुढे लिहिले आहे की, आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की, जर तुम्ही पुढील २४ तासांत कोणतेही योग्य पाऊल उचलले नाही तर आम्हाला काही कारवाई करावी लागेल. ईमेल करणाऱ्याने ईमेलच्या शेवटी ‘बिष्णू’ लिहिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मेलमध्ये असे लिहिले आहे की, “असे करण्यात अयशस्वी झाल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. आम्ही पुढील 8 तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा करतो. आम्हाला प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही असे आम्ही समजू आणि योग्य ती कारवाई करू. विष्णू.”
तिन्ही कलाकारांना वेगवेगळ्या वेळी ही धमकी मिळाली होती, त्यानंतर कलाकार राजपाल यादव यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बीएनएस कलम 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-
‘पुष्पा 2’च्या दिग्दर्शकाच्या घरावर आयकर छापा, सुकुमार विमानतळावरच पकडला