Zomato
झोमॅटोने दिवाळीपूर्वी मोठा धक्का दिला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपने पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. गेल्या एका वर्षात, गुरुग्राम आधारित फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने प्लॅटफॉर्म फीमध्ये अनेक वेळा वाढ केली आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीलाही कंपनीने प्लॅटफॉर्म फी वाढवली होती. मात्र, सणासुदीच्या काळात मोठी मागणी लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
प्लॅटफॉर्म फी 10 रुपये होते
दिवाळीच्या मुहूर्तावर फूड डिलिव्हरी ॲपवरून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने कंपनीने प्लॅटफॉर्म फीमध्ये 60 टक्क्यांनी वाढ केली आहे. जानेवारीमध्ये झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी 4 रुपये केली होती. यानंतर, काही महिन्यांपूर्वी कंपनीने प्लॅटफॉर्म फी 50 टक्क्यांनी वाढवून प्रति ऑर्डर 6 रुपये केली होती. आता दिवाळीपूर्वी झोमॅटोने प्रति ऑर्डर प्लॅटफॉर्म फी 10 रुपये केली आहे, म्हणजेच आता यूजरला प्रत्येक ऑर्डरवर 10 रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागणार आहे.
केवळ एका वर्षात अनेक पटींनी शुल्क वाढले
Zomato ने प्लॅटफॉर्म फी वाढवण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्लॅटफॉर्म फी ग्राहकांकडून ऑपरेशनल कॉस्ट आणि मेन्टेनन्स लक्षात घेऊन आकारली जाते. यापूर्वी कंपनीने प्लॅटफॉर्म फी 1 रुपये ठेवली होती, जी नंतर 2 रुपये आणि नंतर 3 रुपये करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला प्लॅटफॉर्म फी 3 रुपयांवरून 4 रुपये आणि नंतर 4 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आली. सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म फी 10 रुपये करण्यात आली आहे.
Zomato
ॲपच्या अधिसूचनेनुसार, सणासुदीच्या काळात सेवेचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जाते. कंपनीने पहिल्यांदा 2023 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली. Zomato व्यतिरिक्त, प्रतिस्पर्धी ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने देखील गेल्या वर्षीपासून प्लॅटफॉर्म फी आकारण्यास सुरुवात केली आहे. स्विगी सध्या वापरकर्त्यांकडून प्रति ऑर्डर ६.५० रुपये प्लॅटफॉर्म फी आकारत आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना आता प्रत्येक ऑर्डरवर जीएसटी, रेस्टॉरंट चार्जेस आणि डिलिव्हरी फीसह प्लॅटफॉर्म फी देखील भरावी लागेल, ज्यामुळे ऑनलाइन अन्न ऑर्डर करणे आता खूप महाग झाले आहे.
हेही वाचा – व्हॉट्सॲपमध्ये येणार इंस्टाग्रामचे खास फिचर, स्टेटस अपडेट करण्याचा अनुभव बदलणार आहे