Tirupati Temple आंध्र प्रदेशमधील चित्तूर या जिल्ह्यातील तिरुपती तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी मंदिर सर्व भक्तांचे श्रद्धास्थान आहे यांना कोणी तिरुपती बालाजी हे पण म्हणत.
हे मंदिर सर्व वैष्णवांचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात दररोज हजारो लोक दर्शनासाठी भक्तिभावाने येत असतात.
Tirupati Temple History
या मंदिरात भगवान श्री विष्णू वेंकटेश्वरा च्या रूपात स्थापित आहेत अशी भक्तांची धारणा आहे.
श्री वेंकटेश्वर भगवाणांनी कलयुगातील संकटांपासून वाचवण्यासाठी आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी येथे अवतार घेतला आहे अशी भक्तांची मान्यता आहे.
म्हणूनच या जागेला कलियुगातील वैकुंठ असे म्हणतात तर परमेश्वर वेंकटेश्वर यांना कलियुगातील प्रत्यक्ष देवता म्हणतात.
मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे.
तरीसुद्धा ढोबळमानाने हे मंदिर २ooo वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे. परंपरेनुसार ही मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते.
बालाजीची मूर्ती सोने व अशा अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर एवढी आहे.
तिरुपती देवस्थान हे एक देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे.
येथे लोक भरपूर प्रमाणात देणगी देतात पैशाच्या स्वरूपात किंवा आभूषण देऊन आपल्या कामना पूर्ण करतात.
त्याचबरोबर या मंदीराची शैली ही दाक्षिणात्य गोपूर शैली आहे. तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर हे तिरूमला पर्वत रांगेत वसलेले आहे.
तिरूमला रांगांमध्ये एकूण सात शिखरे आहेत जे शेषाची सात शिरे आहेत असे लोक म्हणतात.
हे मंदिर मुख्य रस्त्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. परंतु बरेचसे निस्सीम भक्त 11 किलोमीटर चढ चडून दर्शनाला येतात.
दररोज इथे 20,000 हून अधिक भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात. श्री वेंकटेश्वर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
त्यामुळे येथे लोक मनोकामना पूर्ण झाली की दर्शनाला येतात आणि आपले केस देवाला दान करतात.
वेंकटेश्वर भगवानां बद्दलअपार श्रद्धा भक्तांच्या मनामध्ये असते.
वेंकटेश्वरा ची मूर्ती दगडाची असली तरी मूर्तीमध्ये जिवंतपणा आहे. येथील पुजारी म्हणतात मूर्ती हाताला मऊ आणि मुलायम लागते.
त्यांचे असेही म्हणणे आहे की, परमेश्वराच्या मूर्तीवर सतत समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.
याच मंदिराला भक्त तिरुपती बालाजी मंदिर असेही संबोधतात.
त्याच बरोबर व्यंकटेश्वरांना भक्त श्रीनिवास, गोविंदा तसेच बालाजी, वेंकटरमना अशा अनेक नावांनी ओळखतात.
या ठिकाणी दरवर्षी ब्राम्होत्सव साजरा केला जातो तेव्हा लाखो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
भक्तांच्या दर्शनासाठी येथील विश्वस्थ चांगल्या प्रकारे व्यवस्था करतात तसेच त्यांच्या जेवनाची देखील येथे सोय केली जाते.
या मंदिरा बद्दल एक कथा प्रचलित आहे
काही ऋषी कलियुगामध्ये एक यज्ञ करत होते. या यज्ञाचे फळ नारदांनी त्रिमूर्ती देवस्थान पैकी कोणाला द्यायची याचा सल्ला सुचवला.
या कारणासाठी भृगु ऋषींना या की त्रीमुर्ती देवतांची परीक्षा घेण्यासाठी पाठवण्यात आले.
या ऋषींच्या पायाच्या तळव्याजवळ एक डोळा होता.
प्रथम ते ऋषी ब्रह्मदेवांना भेटायला गेले आणि नंतर त्यांनी भगवान शंकर यांची भेट घेतली.
पण या दोन्ही देवतांनी या ऋषींकडे दुर्लक्ष केले त्यांची दखल घेण्यात आली नाही.
यानंतर ते भगवान विष्णूनकडे गेले परंतु भगवान विष्णूंनी देखील ऋषींची परीक्षा घेण्यासाठी मुद्दामच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
यामुळेच भृगु ऋषी क्रोधीत झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर पाय देऊन प्रहार केला.
यानंतरही विष्णू देवतांनी त्यांच्याकडे लक्ष न देता उलट त्यांच्या पायाला झालेल्या दुखापती मुळे माफी मागितली.
त्याचबरोबर त्यांनी भृगु ऋषींच्या पायाजवळ असलेला डोळा नष्ट केला, आणि या कारणामुळे माता लक्ष्मी क्रोधित झाल्या आणि त्यांनी वैकुंठ सोडले आणि कोल्हापूर येथे येऊन ध्यानस्थ झाल्या.
यानंतर भगवान विष्णू यांनी श्रीनिवास म्हणून मानव अवतार घेतला आणि लक्ष्मीच्या शोधासाठी निघाले शोधता शोधता तेही ध्यानस्थ झाले.
यानंतर माता लक्ष्मी देवी यांना भगवान विष्णू यांची स्थिती समजली असतता त्यांनी ब्रह्मदेव आणि शंकर यांना प्रार्थना केली.
म्हणून ब्रह्मदेवांनी आणि शंकर यांनी गाय व वासराचे रूप धारण केले लक्ष्मी देवींनी तिरूमला या राजा चोला यांच्याकडे गाईला व वासराला सुपूर्त केले.
ती गाय जेंव्हा चरायला जाई तेव्हा रोज श्रीनिवास यांना दूध देत हे सर्व गवळ्याने पाहिले आणि त्याने गाईवर काठीने प्रहार केला तेव्हा भक्त दयाळू श्रीनिवास यांच्या अंगावर वळ उठले.
या कृत्यामुळे श्रीनिवास क्रोधित झाले आणि त्यांनी तिरूमला चा राजा चोला यांना राक्षस बनण्याचा शाप दिला कारण, नोकराने केलेल्या चुकीची जबाबदारी धर्मानुसार त्याच्या मालकाची असते.
परंतु राजा चोला याने श्रीनिवास यांची माफी मागितली तेव्हा देवाने त्यांना सांगितले की पुढचा जन्म तूला आकाश राजा याचा मिळेल तेव्हा तू तुझी कन्या पद्मावती हिच्याशी माझा विवाह लावून देशील.
या घटनेनंतर श्रीनिवास त्यांच्या आईकडे म्हणजे वकुलादेवी कडे गेले आणि तिथेच काहीकाळ तिरूमला पर्वतावर राहिले.
श्रीनिवास यांच्या पद्मावतीशी विवाह
काही काळानंतर राजा चोला याला पुढचा जन्म आकाशराजा म्हणून मिळाला आणि त्याने एका कन्येला जन्म दिला. तिचे नाव पद्मावती असे ठेवले.
या कन्येचा जन्म पद्मपुष्करणी मध्ये झाला होता.
दिलेल्या वचनाप्रमाणे राजाने आपल्या मुलीचा विवाह श्रीनिवास यांच्यासोबत लावून दिला आणि ते दोघेही तिरुमला येथे वास्तव्यास गेले.
काही काळानंतर लक्ष्मी यांना श्रीनिवास यांच्या दुसऱ्या पद्मावतीशी विवाह झालेला कळाला तेव्हा त्या तिरूमला पर्वतावर त्यांच्याकडे जाब विचारण्यासाठी आल्या.
असे म्हणतात की देवी लक्ष्मी आणि पद्मावती देवींनी श्रीनिवास यांच्याकडे या लग्नाचा जाब विचारला असता त्यांनी स्वतः एका दगडाच्या मूर्ती मध्ये रूपांतरण करून घेतले.
हे पाहून ब्रह्मदेव आणि प्रत्यक्ष शंकर तिथे अवतरले आणि त्यांनी लक्ष्मी देवी आणि पद्मावती देवी यांना या सगळ्याबद्दल विचारले असता देवीने त्यांना असे सांगितले की, श्रीनिवास देवांनी मानवाच्या कल्याणासाठी आणि कलियुगातील या संकटांपासून वाचवण्यासाठी त्यांनी इथे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतर दोन्ही देवींनी तिरूमला पर्वतावर देवान सोबत मूर्ती स्वरूपात राहण्याचा निर्णय घेतला आणि यामुळेच भगवान व्यंकटेश्वरांच्या उजव्या बाजूला देवी लक्ष्मी आहेत आणि डाव्या बाजूला पद्मावती देवी स्थानापन्न आहेत.
Tirupati बालाजी विषयी काही रोचक गोष्टी
असे म्हणतात की व्यंकटेश्वर यांच्या मूर्तीवर खरे खरे केस आहेत आणि हे केस कधीही गुंतत नाहीत नेहमी अगदी मुलायम राहतात.
मंदिराच्या बाजूला एक छडी ठेवलेली आहे असे म्हणतात की या छडी चा उपयोग देवांच्या बालवयात मारण्यासाठी केला गेला होता.
याच्या छटा खरोखरच त्यांच्या हनुवटीवर आहेत म्हणून त्यांना तिथे चंदनाचा लेप लावण्यात येतो.
जेव्हा आपण देवाच्या मूर्तीचे दर्शन गर्भ ग्रहांमध्ये घेतो तेव्हा ती मूर्ती गर्भगृहाच्या केंद्रस्थानी आहे असे वाटते पण हेच दर्शन बाहेरून घेतले असतता ती मूर्ती उजव्या बाजूला स्थानापन्न आहे असे दिसते.
दर गुरुवारी देवांच्या मूर्ती वर पांढऱ्या चंदनाचा लेप लावला जातो पण जेव्हा दुसऱ्या दिवशी हा लेप उतरवण्यात येतो तेव्हा त्यांच्या शरीरावर लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेली दिसून येतात.
या मंदिरामध्ये एक दिवा आहे जो सतत तेवत असतो कोणालाही माहिती नाही की हा दिवा केव्हापासून प्रज्वलित आहे.
Raj Rajeshwari Mandir या मंदिरात मुर्त्या एकमेकांना बोलतात.
तर असे हे भारतातील वैभव शाली मंदिर जे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे जे अगदी निसर्गरम्य जागी वसलेले आहे.
मनोभावे या मूर्तीचे दर्शन केल्यास मन अगदी शांत होते.या ठिकाणी वेंकटरमना गोविंदा हा जप सतत चालू असतो tirupati online ticket booking
त्यामुळे मंत्रमुग्ध व्हायला होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks