आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Raj Rajeshwari Mandir भारतात विविध ठिकाणी विविध आचार, विचार, धर्म, संस्कृति आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.

भारतात विविध ठिकाणी देवदेवतांची पूजा केली जाते.

त्या ठिकाणचे वेगळे महत्व असते त्यांची एक वेगळी ओळख असते आज आपण आशाच एका मंदीरा बद्दल जाणून घेणार आहोत जे ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल. 

एक प्रसिद्ध आणि चमत्कारी मंदीराबद्दल बोलत आहोत हे मंदिर बिहार मधील बस्तर येथे राज राजेश्वरी त्रिपुर सुंदरी मंदिर या नावाने ओळखले जाते.

Raj Rajeshwari Mandir

हे मंदिर तंत्र साधनासाठी ही ओळखले जाते.  

असे म्हणतात की येथे कोणी नसताना ही आवाज एकू येतात.

याला अंध विश्वास म्हणावा की दैवी चमत्कार गोष्ट खरी आहे येथे साधना करणाऱ्या प्रतेक साधकाची मनोकामना पुर्ण होते.

येथे रात्र रात्र साधक साधना करत बसतात. या मंदिरात मुख्य राज राजेश्वरी त्रिपुर सुंदरी आहे.

या मंदिरात अजून दहा महाविद्या असलेल्या प्रतिमा आहेत.

काली, त्रिपुर भैरवी, धुमावती, तारा आशा अनेक मूर्तीं स्थापित आहेत तसेच येते बांगलामुखी, दत्तात्रय, भैरव, बटुक भैरव, अन्नपुर्ण, काल भैरव व मातंगी भैरव यांच्या पण प्रतिमा स्थापित आहेत

तंत्र साधनांसाठी प्रसिद्ध असलेले या मंदिराची स्थापना भवानी मिश्र नावाच्या तांत्रिकाने चारशे वर्षांपूर्वी केली.

Raj Rajeshwari Mandir
Raj Rajeshwari Mandir

तेव्हापासूनच या मंदिराच्या पूजा आरती करण्याचा मान तांत्रिक परिवाराचे सदस्य सांभाळत आहेत.

इथे देवीची प्राणप्रतिष्ठा तंत्र साधना ने केली जाते. तांत्रिकांची आस्था या मंदिरासाठी अतूट आहे.

दीर्घायुष्य देणारे दीर्घेश्वर मंदिर ( Dirgheshwar Nath Mandir ) दीर्घायुष्य देणाऱ्या मंदिराची कहाणी

असे म्हणतात की निस्तब्ध रात्रीमध्ये या स्थापित मुर्त्या बोलताना आवाज येतो. मध्यरात्री जेव्हा लोक तिथून जात असतात तेव्हा त्यांना आवाज स्पष्ट ऐकू येतो. 

वैज्ञानिकांचे असे मान्य आहे की लोकांना भास होतात. परंतु या मंदिराच्या आजूबाजूला काही शब्द घुमतात.

वैज्ञानिकांच्या रिसर्च नुसार त्यांचे असे म्हणणे आहे की इथे शब्द लगातार भ्रमण करत असतात.