Panchamrut जन्माष्टमीच्या दिवशी बनवण्यात येणारे पंचामृत ठरते आरोग्यासाठी अमृतच
श्रावण महिना म्हणलं की सन आलेच आणि आपल्याकडे सण असो किंवा पूजा असो प्रसादा मध्ये असणारे पंचामृत सर्वांनाच माहिती आहे.
सत्य नारायणचा पूजेलाही प्रसाद द्यायचा आधी पंचामृत देतात. हे पंचामृत पाच पदार्था पासून बनले जाते त्यामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप या पदार्थांचा समावेश होतो. पंचामृत नावाप्रमाणेच आपल्या आरोग्याला अमृतच ठरते .
कसे बनते पंचामृत? How to Make
Panchamrut recipe for pooja in marathi
पंचामृतात दूध, दही एक चमचा तसेच एक चमचा मध आणि गरजे नुसार साखर आणि एक चमचा तूप एकत्र करून त्यात ५ ते १० तुळशीचे पान पण घालू शकता.
कोणी कोणी त्यात केसर आणि बदाम पण आवश्यक असल्यास वापरतात. या पाच तत्वा मुळे पंचामृत अतिशय पोष्टीक बनते.
Hanuman Chalisa हनुमान चालीसा पठणाचे आरोग्यासाठी फायदे
पंचामृताचे फायदे Panchamrut benefits
सगळ्यात पहले तर पंचामृत खल्याने सकारात्मक भाव वाढतो.तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते. पंचामृताचे सेवनाने कमजोरी दूर होते.
शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. आणि तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगांपासून लढण्याची शक्ती वाढते.
जर तुम्ही सांधे दुखीच्या त्रासापासून त्रस्त आहात तर तुम्हाला पंचामृत खाल्ल्याने आराम मिळेल. आणि या रोगापासून मुक्त होऊ शकता.
पचनाच्या संबंधित असणारे आजार असेल तर Panchamrut पंचामृताचा सेवनाने सुधारतील आणि पचन क्रिया व्यवस्थित होते.
गॅसेस आणि ऍसिडिटी पासून आराम मिळण्यास फायदा होतो. त्यामुळे पंचामृताचे सेवन केले पाहिजे.
सौंदर्य वाढविण्यासही पंचामृत फायद्याचे ठरते. पंचामृत खल्याने चेहऱ्यावर तेज येते आणि फोड किंवा पूरळान पासून मुक्ती मिळते.
पण कुठल्याही गोष्टीचे अति सेवन केल्याने त्याचे नुकसान शरीरावर होत असतो त्यामुळे पंचामृत प्रमाणातच खावे. आणि त्याचा फायदा करून घ्यावा.