आगाऊ तिकीट बुकिंगसाठी IRCTC चे नवीन नियम आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. तुम्ही देखील रेल्वे आरक्षणासाठी IRCTC ॲप किंवा वेबसाइट वापरत असाल तर तुम्हाला रेल्वेच्या या नवीन नियमाची माहिती असायला हवी. भारतीय रेल्वेने आता आगाऊ तिकीट बुकिंगचे नियम बदलून आपली मर्यादा कमी केली आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मने आगाऊ तिकीट बुक करण्याचा कालावधी आता 120 दिवसांवरून 60 दिवसांवर आणला आहे.
आजपासून नियम बदलले
भारतीय रेल्वेने गेल्या महिन्यात याची घोषणा केली होती. आयआरसीटीसी प्लॅटफॉर्मसह, हा नवीन नियम कोणत्याही थर्ड पार्टी तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर किंवा पेटीएम, इक्सीगो, मेक माय ट्रिप यांसारख्या ॲपवर देखील लागू आहे. तसेच, हा नियम ऑफलाइन किंवा काउंटर तिकिटांवरही लागू होईल. ट्रेनमधील वाढती प्रतीक्षा यादी पाहता भारतीय रेल्वेने आगाऊ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये हा बदल केला आहे. विशेषत: सणासुदीच्या चार महिन्यांपूर्वी अनेक गाड्यांमधील तिकिटे फुल्ल होत असल्याने अनेक रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
IRCTC प्लॅटफॉर्मद्वारे, वापरकर्ते आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस आधीच आगाऊ तिकीट बुक करू शकतील. नियमित तिकिटे ॲप आणि वेबसाइटद्वारे केव्हाही बुक करता येतात. त्याच वेळी, ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 24 तास आधी तत्काळ तिकीट बुक केले जाऊ शकते. तत्काळ तिकीट खिडकी AC साठी सकाळी 10 वाजता आणि नॉन-AC साठी 11 वाजता उघडते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही आगाऊ रेल्वे तिकीट बुक करायचे असेल, तर आता तुम्ही फक्त 60 दिवस आधीच तिकीट बुक करू शकता.
IRCTC प्लॅटफॉर्म अपग्रेड केले
IRCTC ने गेल्या काही वर्षांत आपला प्लॅटफॉर्म खूप अपग्रेड केला आहे. आता युजर्सना ऑनलाईन तिकीट बुक करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. रेल्वेने गेल्या काही वर्षांत आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. तुम्ही सकाळी ८ वाजण्यापूर्वी ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन केले असल्यास, तुम्ही सकाळी ८ वाजता लॉग आउट कराल. ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी, तुम्हाला पुन्हा लॉग इन करावे लागेल.
त्याच वेळी, तत्काळ तिकिटासाठी तुम्हाला सकाळी 10 आणि 11 वाजता लॉग इन करावे लागेल. याशिवाय, एकदा लॉग-इन केल्यानंतर फक्त एक पीएनआर नंबर जनरेट केला जाऊ शकतो. दुसऱ्या तिकिटासाठी म्हणजेच PNR साठी, तुम्हाला पुन्हा IRCTC ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – गुगलने करोडो यूजर्सना दिले ‘सरप्राईज’, अँड्रॉइड १६ अपेक्षेपेक्षा लवकर येणार, होणार मोठा बदल!