How to start LPG Gas Subsidy दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत आहेत, त्यामुळे सर्वत्र महागाई वाढत आहे,ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना खूप कसरत करावी लागत आहे My LPG .
अशा मध्येच दिवसेंदिवस एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढत आहेत. या वर्षाचा इतिहास पाहिला असता दर महिन्याला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढलेल्या आहेत.
सध्याच्या स्थितीला गॅस सिलेंडर मिळणारी सरकारी सबसिडी खूप महत्त्वाची आहे.
अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरची सबसिडी मिळत नसेल तर ती तुम्ही पुन्हा चालू करू शकता त्यासाठी तुम्हाला दिलेल्या काही टिप्स पार पाडाव्या लागतील.
How to start again LPG Gas Subsidy
My LPG
१) सर्वप्रथम My LPG एलपीजी गॅसची अधिकृत वेबसाईट म्हणजे www.mylpg.in वरती भेट द्यावी लागेल. आणि Click here to know your LPG ID क्लिक करावे लागेल.
नंतर तुमचा सर्विस प्रोव्हायडर निवडावा लागेल.
पेज ओपन झाल्यानंतर तर लॉगिन करण्यासाठी कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे, जर तुमच्याकडे लॉगिन नसेल तर तुम्ही तिथे नवीन अकाउंट क्रिएट करू शकता.
२) जेव्हा तुम्ही लॉगिन व्हाल तेव्हा एक नवीन पेज ओपन होईल, डाव्या साईटमध्ये तुम्हाला view cylinder booking history या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.
येथे तुम्ही बुकिंग सिलेंडरची हिस्ट्री तपासू शकता, आणि त्यावर LPG Gas Subsidy मिळाली आहे की नाही हेही तपासू शकता
३) जर सबसिडी मिळत नसेल तर तिथे दिलेल्या फीडबॅक या बटनावर ती क्लिक करून तुमची रीतसर तक्रार करू शकता
टीप : ज्यांचे उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडी चा लाभ मिळत नाही. याशिवाय तुम्ही सबसिडी सोडून देण्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही.
How to add name in ration card online ? आता घरबसल्या राशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांचे नावे जोडा
अधिक माहितीसाठी दिलेल्या टोल फ्री नंबर वर ती चौकशी करू शकता आणि तक्रार नोंदवू शकता
टोल फ्री नंबर: 18002333555
Trackbacks/Pingbacks