Crossing of cheques
चेकवर डाव्या बाजूला सर्वात वर कोपऱ्यात दोन तिरक्या रेषा का मारल्या जातात, हे तुम्हाला ठाऊक आहेका?
चला तर मग आज आपन या लेखात या बद्दल माहिती घेणार आहोत.
आर्थिक व्यवहार आपण चेकच्या माद्यमातूनच करत असतो.
जर खुप मोठी रक्कम असेल तर हा व्यवहार ठोक रक्कम न देता चेक द्वारे केला जातो.
मोठ्या रक्कम स्वतः जवळ ठेऊन कोणीही जोखीम पत्करत नाही.
आणि म्हणूनच चेक मुळे मोठी रोख रक्कम स्वतः कडे न बाळगताही कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होतात.
हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी खाते धारकाला आपल्या चेकवर पेमेंट करण्याचे आदेश देण्यासाठी आपली स्वाक्षरी करणे महत्वाचे असते.
चेकवर ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचे नाव, समोरचा माणूस त्या व्यक्तीला किती पैसे देणार आहे याचा तपशील तसेच बँकेचे डिटेल्स अशी बरीच माहिती असते.
या शिवाय तुम्ही जर कधी लक्ष देऊन पाहिले असेल तर
आणखी एक गोष्ट चेकवर आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे चेकवर वरच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात मारलेल्या दोन तिरक्या रेषा
चला तर जाणून घेऊयात या रेषांचा अर्थ काय असेल.
Know the mening and importance of Crossing of cheques
आर्थिक व्यवहार करत असताना या चेकवरील दोन रेषांना खूप महत्व आहे.
या दोन रेषा चेक वर मारल्यास या चेकचा अर्थ किंवा याचे स्वरूप पूर्ण बदलून जातो.
या रेषा नाही मारल्या तर ज्याला हा चेक दिला आहे त्याला पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते.
म्हणजे ज्या व्यक्तीला पैसे द्यायच्या आहेत त्याच्या साठी या दोन रेषा महत्वाच्या असतात.
benefits of crossing cheques काय उपयोग आहे या दोन रेषांचा
या दोन रेषा मारल्याने असा फायदा होतो कि, ज्या व्यक्तीच्या नावे हा चेक दिलाय त्याच्या बँक खात्यावरच पैसे जमा होतात.
असा चेक जर तुम्ही बँकेत दिला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत
आधी तुम्हला तो चेक बँकेत डिपॉझिट करावा लागेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढावे लागतील.
म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला जर मोठ्ठी रक्कम संबंधित व्यक्तीच्या थेट खात्यावर पैसे जमा व्हावेत असे वाटत असेल तर तुम्ही आवर्जून या दोन रेषा मारु शकता.
why judge breaks nib of pen after death sentence in Marathi जज आपल्या पेनची निब का तोडतात?
आणि दुसरी कडे एखाद्या व्यक्ती कडे बँक खाते नसेल किंवा बँक खाते असूनही त्या व्यक्तीला तातडीने पैशाची गरज असेल तर या दोन रेषा मारणे टाळायला हवे.
कारण जर तुम्ही त्या दोन रेषा मारल्या तर तो चेक संबंधित व्यक्तीला आपल्या बँके खात्यात जमा झाल्या शिवाय पैसे मिळणार नाहीत.
या प्रोसेसला दोन ते तीन दिवसांचा वेळ जातो
त्यामुळे संबंधित व्यक्तीला तातडीची पैशाची गरज असेल आणि तुम्ही त्याची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी पैसे दिले असतील तर तुम्हाला अशा रेषां मुळे अडचण येऊ शकते.
तर या सर्व कारणांमुळे चेक वरील त्या दोन रेषा महत्वाच्या असतात .
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
खुप महत्वाची माहिती दिली आहे आपण मनापासुन आभार
.. .🙏
Good Information..
Its helpful thanks