Pataleshwar Temple हे पुण्याच्या नामांकित ठिकानपैकी एक ठिकाण आहे तिथे काय उणे ही म्हण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि या म्हणीचा प्रत्येय तेव्हा येतो जेव्हा तुम्ही पुण्यात येता.
पुण्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. पुण्यामध्ये असे अनेक ऐतिहासिक पुरावे आजही बघायला भेटतात.
विचार करताना मनामध्ये सहज विचार आला पुण्यामध्ये लेण्या नाही दिसल्या पण जेव्हा याची माहीती काढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा बरीच माहिती मिळाली.
पुण्यात दगडू शेट गणपती मंदिर, सारस बागेतील गणपती, शनिवार वाडा या सोबतच दगडा मध्ये कोरलेले ऐतिहासिक लेणी असणारे जंगली महाराज रोड वरील पाताळेश्वर मंदिर आहे.
पाताळेश्वर मंदिराच्या इतिहास बद्दल
तसे पाहायला गेले तर पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक घडामोडी घडून गेलेले आहेत. अनेक राजवटी येथे नांदुण गेलेल्या दीसतात.
हे मंदिर जमिनी मध्ये खोल पाताळात जमिनी पासून एक ते दोन मीटर खाली आहे.
पाताळेश्वर मंदिर खाली आहे त्यामुळे याला पाताळेश्वर मंदिर म्हणत असावे. हे मंदिर JM रोड वरील जंगली महाराज मंदिराच्या शेजारी आहे.
यामुळे इथे आपण सहज पोहोचू शकतो. परंतु या मंदिराची सध्या खूप दूरवस्था झालेली आहे.
पाताळेश्वर मंदिर व्यवस्थे कडे दुर्लक्ष केले तर काही वर्षातच या ऐतिहासिक पुराव्यालाही मुकावे लागेल.
या लेण्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता दगड फोडून आणि त्याला आकार देऊन बनवलेला आहे.
या पायर्यां वरुन गेलं की लगेच आपल्या समोर एका मोठया नंदी चे दर्शन होते. यानंदीचा सभा मंडप ४ मीटर उंचीचा आहे. आणि १२ जाड्जूड खांबावर हा गोलाकार मंडप उभारलेला आहे.
हा नंदी दगडाचा असून खूप मोट्या आकाराचा आहे. या नंदीचा गळ्या भोवती साप गुंडाळलेला दिसतो. याचा गळ्यात घंटयांची माळ दीसते.
या मंदिराच्या प्रांगणामध्ये डाव्या बाजूला कोपऱ्या वरती ओसरीचे बांधकाम दिसून येते. याचा मध्ये पुडया तच एक पाण्याची टाकी आहे हे मंदिर गुहे सारखे दिसते.
या गुहेचे दोन खांब पुडे आणि एक खोली अशी याची रचना आहे. लेणी अभ्यासक जेम्स फर्ग्युसन यांच्या अभ्यासानुसार इथल्या लेण्या आठव्या शतकात निर्माण झाल्या असाव्यात.
कारण या मंदिराच्या दाराशी लेणी शिल्प कोरले गेलेले आहे. हे शिल्प अर्थात खूप निरखून पाहिल्यास दिसून येतात.
पाताळेश्वर मंदिर लेण्या पाहण्या सारख्या आहेत. कारण मुख्य लेणीच्या पायऱ्या चढत असताना उजव्या बाजूला वरती चढत असतानाच एक शिलालेख अस्पष्ट असा नजरेस येतो.
हा लेख देवनागरी लिपी मध्ये लिहिलेला असावा परंतु हा अस्पष्ट असल्यामुळे नीट वाचता येत नाही.
पहिल्या ओळी तले फक्त श्री गणेशाय नमः इत्यादी अक्षरे वाचता येतात.
पण बाकीचे अक्षरे धूसर झालेली आहेत. पायर्यांच्या वरती तीन कोरलेल गाभारे दिसून येतात.
Vishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास
पाताळेश्वर मंदिर आणि भोलेनाथ शंकराचे शिवलिंग Pataleshwar Temple
तसेच मधल्या गाभाऱ्यामध्ये भोलेनाथ शंकराचे शिवलिंग दिसून येते. ही मूर्ती खूप देखणी आहे. पाहून मनाला शांतता मिळते. मन प्रसन्न होते.
तीनही गभर्या शी तीन गदाधारी द्वारपाल उभे दिसून येतात. पण त्यांचा तपशील मिळत नाही.
तसेच उजवी कडील गाभार्यात देवीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. तर डाव्या हाताच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती दिसून येते.
या तीनही गाभाऱ्याना प्रदक्षणा मारण्यासाठी दगडाचा ओबड धोबड मार्ग आहे. दगडांवर पाना फुलांची कोरले नक्षी दिसून येते.
पूर्वी हे मंदिर गावाच्या बाहेर होते पण आता गाव खूप मोठे वसलेले आहेत. त्यामुळे ते गावाच्या मध्यभागी आलेले आहे.
सध्याच्या काळात या पाताळेश्वर मंदिर कडे लोक फक्त फिरायला म्हणून जातात.
थोडे फार लक्ष देऊन आपली मानसिकता बदलून जर या ऐतिहासिक अवशेषांकडे लक्ष दिले तर हे पुण्यातील पर्यटन स्थळ म्हणून बघितले जाईल
आणि शहराच्या पर्यटन विकासाला हातभार लागेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम
Trackbacks/Pingbacks