आज आम्ही तुम्हाला Yangsi Village China म्हणजे बुटक्या लोकांचे गाव या कुतुहला विषयी सांगणार आहोत
आपले जग खूप मोठे आहे. या जगात आश्चर्यकारक असे खूप काही असते. या जगात अशी बरीच गावे आहेत ज्याचे काहीतरी नावीन्य आहे. ऐकून आपल्याला कुतूहल वाटेल.
याच गोष्टीबद्दल बॉलिवूडमधील शाहरुख खान याने एक सिनेमा काढला होता. ज्याचे नाव होते झिरो. हा सिनेमा त्यावेळेस खूप चालला नाही.
परंतु यामध्ये त्यांनी बुटक्या लोका बद्दलच्या समस्या आणि त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहिले पाहिजे. यावर प्रदर्शित केला गेला होता.
गावाचे कुतूहल
आज आम्ही अशाच एका बुटक्या लोकांच्या वस्ती बद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बुटकेपणा ही एक नैसर्गिक कमतरता आहे.
परंतु याकडे लक्ष न देता लोक त्यांच्याकडे तूच्छतेच्या दृष्टीने आणि मस्करी ने पाहतात. त्यांची हेटाळणी करतात. त्यांच्यावर विनोद करून हसतात.
बुटक्या माणसांची जन्माची टक्केवारी खूप कमी असते. २०००० मध्ये १ मनुष्य हा बुटका
म्हणून जन्माला येतो. म्हणजे त्यांची एकूण लोकसंख्या ०.००५ एवढी असते.
परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की चीन मधील शिचुआन प्रांता तिल Yangsi (Yangsi Village China) या गावांमधील ५० टक्के लोकसंख्या बुटकी आहे.
या गावातील लोकांच्या ८० पैकी 36 लोकांची उंची २ फूट १ इंचापासून ३ फुट १० इंचा इतकी आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात या गावांमध्ये लोक बुटके असल्यामुळे या गावाला बुटक्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बुटके कसे आहेत?
याचे गेल्या 60 वर्षांपासून शास्त्रज्ञांना सुद्धा रहस्य उलगडलेले नाही.
१९५१ मध्ये या बुटक्या लोकांचे गाव बद्दल पहिली केस समोर आली .
Yangsi Village China गावातील काही वृद्ध लोकांचे असेही म्हणणे आहे की, काही दशकांपूर्वीच त्यांचे सुखकर आणि आरामदायी जीवन संपुष्टात आले होते.
कारण या गावात एका भयानक रोगाने तांडव घातला होता. तेव्हापासूनच या गावांमध्ये लोकांना बुटकेपणा ला सामोरे जावे लागले.
त्यामध्ये जास्त करून पाच ते सात वर्षातील मुलांची उंची वाढणे थांबते आणि त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागते.
१९११ साली या भागात पहिल्यांदा बुटक्या लोकांना पाहण्याची बातमी समोर आली. १९४७ मध्ये एका इंग्रजी शास्त्रज्ञाने शेकडो बुटक्या लोकांना पाहण्याची बातमी समोर आली.
परंतु जेव्हा या लोकांनी या बुटकेपणा ची तक्रार प्रशासना कडे केली तेव्हापासूनच ही समस्या जगापुढे आली.
जेव्हा १९८५ साली जनगणना करण्यात आली तेव्हा गावात अशी ११९ प्रकरणे समोर आली. ही समस्या पुढे न थांबता वाढतच गेली.
आपल्या मुलाबाळांना हा रोग होऊ नये म्हणून काही लोक हे गाव सोडून निघून गेली. पण ६० वर्षानंतर थोडासा सुधार झाला आहे.
पण अजूनही नवीन पिढीमध्ये बुटकेपणा दिसून येतोच.
Mawlynnong आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव
बुटक्या लोकांचे गाव हे अजूनही रहस्य उलगडले नाही
अचानक असे काहीतरी झाले आणि सामान्य उंची असलेले गाव बुटक्या लोकांमध्ये परिवर्तित झाले.
६० वर्षापासून शास्त्रज्ञ हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
या गावातील माती, पाणी, अन्न या सर्वांची पुन्हा पुन्हा तपासणी करून झालेली आहे.
परंतु शास्त्रज्ञांच्या काही हाती आलेले नाही. आणि ते यामागचे रहस्य शोधू शकले नाही.
१९४७ साली या आजाराचे कारण सांगताना असे सांगितले की तिथल्या जमिनी मध्ये पाऱ्याचे प्रमाण आढळून आले होते.
पण हे ही खरे कारण नसण्याचे सिद्ध झाले होते.
जपानने काही दशकांपूर्वी सोडलेल्या विषारी गॅस मुळे ही समस्या निर्माण झाली असावी.
असे येथील काही लोकांचे म्हणणे होते. परंतु इतिहासानुसार जपान कधीही चीनच्या भागात आलेला नाही. अशी काही वेगवेगळी कारणे देण्यात आले.
परंतु खरे काय ते अजूनही रहस्यच आहे. गावातील काही लोकांचे असे म्हणणे आहे की हा कोणत्या तरी वाईट शक्तीचा प्रभाव असेल.
तर काहीजण असेही मानतात की पूर्वजांचे अंत्यसंस्कार नीट केले गेले नुसतील.
पर्यटकांना जाण्यास मनाई
चीन देश या गावाला बुटक्या लोकांचे गाव मान्यास तयार आहे. परंतु या गावात दुसऱ्या कोणालाही जाण्यास मनाई केली जाते.
किंवा दुसऱ्या देशातील पर्यटकांनाही या देशात जाण्यास मनाई आहे. फक्त येथे पत्रकार जातात आणि त्यांच्या कडूनच खरी काय ते माहिती मिळते.
Bharich