Mucormycosis किंवा काळी बुरशी हा आजार कसा होतो किंवा हा आजार काय आहे. 

आधिच कोरोनाने लोक त्रस्त झालेत आणि त्यात हा नवीन आजार कोरोंना होऊन गेलेल्या रुग्णान मध्ये आढळून येतोय.

Mucormycosis या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्याना दिल्या.

तर आपण या काळी बिरशी किंवा ज्याला म्युकर माइकोसिस म्हणतात.

या आजार बद्दल जाणून घेऊयात. 

कोरोना बरा झालेल्या रुग्णानमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारी मध्ये वाढ होते.

ते इन्फेक्शन वाढून डोळे जाण्याची संभावना येते. या आजारालाच म्युकर माइकोसिस असे म्हणतात.

राज्याचे आरोग्य मंत्री यांनी कोरोंना होऊन या आजाराचे इन्फेक्शन वाढले असता या आजारसाठी राज्य सरकारकडून मोफत उपचार केले जातील असे सांगितले आहे. 

बुरशी मुळे होणाऱ्या या आजाराला काळी बुरशी किंवा म्युकर माइकोसिस असेही म्हणतात. 

काय आहे हा म्युकर माइकोसिस ?

Mucormycosis Infection

Mucormycosis Infection

जेंव्हा पासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली यामुळे रुग्णांच्या नाक आणि डोळे या मध्ये इन्फेक्शन वाढत जाण्याच्या तक्रारीत वाढ झाली असे तज्ञांचे मत आले. 

मुंबईच्या जे जे रुग्णालयाचे ENT तज्ञ डॉक्टर श्री निवास यांनी अगदी सोप्या शब्दात सांगितल की म्युकर माइकोसिस हा बुरशी मुळे होणार आजार आहे.

बुरशी म्हणजे fungus च्या इन्फेक्शनचा धोका सर्वांनाच असतो. या आजाराचे इन्फेक्शन एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्ती ला होण्याचा धोका आधीक असतो. 

हा आजार sinus मध्ये नाकाच्या मोकळ्या जागेत बुरशीचे प्रमाण वाढते. ही बुरशी हवेच्या संसर्गामुळे वाढते आणि याचे ईन्फेक्शन एकमेकाना होते.

आजाराची लक्षणे 

Mucormycosis Symptoms तज्ञ डॉक्टरांच्या मते या आजारांच्या रुग्ण संखेत वाढ होत असल्याने याचे लक्षण रुग्णानी लवकर ओळखणे गरजेचे आहे. 

नाक घसा कान तज्ञ डॉक्टर शरद भालेकर यांच्या मते रुग्णामध्ये या आजाराची ही प्रमुख लक्षणे आढळून येतात. 

१ डबल व्हीजन म्हणजे एकच वस्तु डबल दिसणे. 

२ मेंदूत ईन्फेक्शन पसरल्यास तीव्र डोके दुखी होणे. 

३ नाकातून रक्त वाहने. 

आजाराची करणे 

काही डॉक्टरांच्या मतानुसार म्युकर माइकोसिस हा आजार रोगप्रतिकार शक्ति ज्यांची चांगली आहे त्यांना या आजारचा धोका नाही पण ज्यांची रोग प्रतिकारशक्ति कमी आहे त्यांच्या साठी हा आजार घातक आहे. 

व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फिजीशियन डॉ. हनी सावला यांच्या मते या आजाराची ही प्रमुख चार करणे आहेत. 

शरीरातील अनियत्रित साखरेचे प्रमाण किंवा अनियत्रित मदुमेह 

स्टीरॉईड चे अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा प्रमाण. 

ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स 

शरीरातील न्युट्रॉफीलस चे प्रमाण कमी होणे.
या व्यतीरिक्त कोरोना दरम्यान रुग्णांची कमी झालेले रोगप्रतिकारक शक्ति तसेच शारीरातिल व्हायरस कमी करण्यासाठी दिली जाणारी औषधे.

कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने संसर्गाला सायनस मध्ये घुसण्यासाठी वाव मिळतो.

त्यामुळेच संसर्ग पसरतो. असेही काही तज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

कोरोंना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मधुमेह रुग्णांची संख्या जास्त आहे. तज्ञांच्या मते या रुग्णांची रोग प्रतिकरक शक्ति कमी असते ही संसर्गाचे प्रमुख कारण आहे.

डॉक्टरांच्या मते जे जे रुग्णालयात या म्युकर मायकोसिस या आजारावर उपचार घेणारे बहुतेक रुग्ण ही मधुमेह ग्रस्त आहेत.

म्युकर मायकोसिस या आजारवरील उपचार  Mucormycosis Treatment

डॉक्टर चव्हाण यांच्या म्हणण्या नुसार म्युकर माइकोसिस रुग्णांची शस्त्रक्रिया करावी लागते. त्याच बरोबर सायनस चे ईन्फेक्शन कमी करण्यासाठी एन्डोस्पोपिक सायनस सर्जरी करून बुरशी काढावी लागते. 

राज्यातील काही भागातील कोरोना रुग्ण म्युकर माइकोसिस या आजाराने लोक त्रस्त आहेत. याची दखल राज्याचे आरोग्य विभागाने घेतली आहे. 

या आजारा बद्दल लोकाना माहिती व्हावी यासाठी या आजाराची जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच या आजारांच्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य या योजेनेतून मोफत उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

Mucormycosis Diabetes

या आजाराला घाबरून न जाता कोरोना रुग्णांची योग्य काळजी घ्यावी. मधुमेह रुग्णांनी साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे. यासाठी व्यायाम करावा योग्य आहार घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत असे आव्हान आरोग्य मंत्री यांनी केले.