Bermuda Triangle Mystery Solved सर्वांसाठी रहस्य असलेले बर्मुडा ट्रँगल चं गुपित उलगडलं असे शास्त्रज्ञांचे म्हणण आहे.
वाचा याचा खरं रहस्य आहे. .रहस्य म्हणल की सर्वांचाच कुतुहलचा विषय.
एखादी गोष्ट रहस्यमय आहे असे कळले की ती जाणून घेण्याची उत्सुकता खूप वाढते. ती गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण त्या गोष्टीचा मुळा पर्यन्त जातो.
रहस्य म्हणजे उत्सुकता हे समीकरण लहानपणा पासूनच आपल्या अंगवळणी पडलेले असते.
विज्ञानाची आवड असणाऱ्या आणि त्या बद्दल कुतूहल वाटणाऱ्या प्रत्येकाला बर्मुडा ट्रँगल च्या रहस्य बद्दल माहीत असेलच.
लहानपणी ऐकलेले आश्चर्यकारक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे बर्मुडा ट्रँगल ज्या ठिकाणी आत्तापर्यंत बरेच अनेक जहाज आणि विमाने गायब होत असे.
त्या ठिकाणी का होते ? हे शोधण्या च काम अनेक वर्ष चालू आहे.
हे नेमक काय आहे भुताटकी का एखादा विज्ञानाचा प्रकार आहे यावर आजवर बऱ्याच जनानी यावर तर्क वितर्क काढलेत.
मात्र त्यावर ठोस असे मत कोणाचे नव्हते. या शिवाय काही जनाणी तर या रहस्याचा उलगडा अशक्य आहे असे सांगितले.
पण आत्ता मात्र या रहस्याच गुड उलगडलेले आहे. काही शास्त्रज्ञाच्या मते या रहस्याचा उलघडा झालेला आहे.
जेव्हापासून बर्मुडा ट्रँगल ही गोष्ट जगासमोर आलेली आहे तेव्हापासून ती एक रहस्यमय गोष्ट सर्वांसाठी झालेले होती.
तेव्हापासून शास्त्रज्ञ या बर्मुडा ट्रँगल चे रहस्य शोधून काढण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. याबद्दल अनेकांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले.
त्यापैकी काहीजणांच्या म्हणन्या मध्ये अंशतः सत्यता होती तर काही जणांचे म्हणेने बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात या उक्ती प्रमाणे होते.
Bermuda Triangle Mystery Solved
आता एका शास्त्रज्ञांच्या टीमने बर्मुडा ट्रँगल चे रहस्य उलगडण्याचा दावा केला आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल
50000 किमी क्षेत्र फळात पसरलेल्या या माहासागरातील बर्मुडा ट्रँगल च्या या परिसराणे आजवर हजारो विमाने आणि जहाजे गिळंकृत केलेली आहेत.
मागील १०० वर्षात १००० लोक या बर्मुडा ट्रँगल च्या भक्ष्यस्थानी पडण्याची नोंद आहे. त्या परिसराचा कित्येक दूर मैल वरून जाणारी जहाज देखील या बर्मुडा ट्रँगलचे शिकार ठरलेले आहेत..
शास्त्रज्ञांच्या म्हणण्या नुसार Air Bombs च्या मिसळण्याने बर्मुडा ट्रँगल च्यावर आकाराचे ढग तयार होतात या air bombs च्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या हवेचा वेग इतका जोरात असतो की ज्यामुळे समुद्रात ४५ मीटर उंच एटक्या लाटा तयार होतात. Micro Bursts आल्यामुळे या Air Bombs तयार होतात. Micro Bursts ढगांच्या खालून जातात आणि फुटतात.
फुटल्यामुळे ते महा सागराला जाऊन धडकतात आणि त्यातून प्रचंड आकाराच्या लाटा निर्माण होतात त्यामुळे या प्रदेशात येणारी कोणतीही गोष्ट लाटा खेचून घेतात.
बर्मुडा ट्रँगल च्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात विशाल काय ढग निर्माण पाहायला मिळतात. जे २० ते २५ मैल दूरवर पसरलेले दिसतात. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या दाव्यात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचे अनेक जाणकरांच मत आहे.
यावरुन असे दिसून येते की, हे उत्तर बऱ्याच अंशी सत्य उलगडू शकल आहे. त्यामुळेच या भागांमध्ये विमाने आणि जहाजे अदृश्य होतात. हे कुठले ही भुताटकी नसून हे एक वैज्ञानिक आहे हे सिद्ध झाले आहे.
आज पर्यंत या भागामध्ये अनेक अपघात घडलेले आहेत. याचे रहस्य लवकरच सगळे अशी अपेक्षा आता आपणच करू शकतो.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम