Tomatina Festival जगामध्ये खूप प्रकारचे फेस्टिवल असतात. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात, काही उत्सव खूप गमतीशीर असतात, तर काही उत्सव खूप गंभीर रित्या पण साजरे केले जातात.
आज आपण अशाच एका उत्सवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, सुरुवातीला आपण जाऊया का हिंदी चित्रपटाकडे जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामध्ये काही गाणे आणि काही दृश्य स्पेन या देशात चित्रित केले आहेत. त्यामध्ये त्या उत्सवाबद्दल दाखवले गेले.
Tomatina Festival
तर चला जाणून घेऊयात टोमाटीना या आगळ्यावेगळ्या उत्सवाबद्दल, आपण होळीमध्ये धुळवडीच्या दिवशी रंग खेळतो, तसे स्पेनमध्ये या उत्सवात एकमेकांना टोमॅटो फेकून मारून हा उत्सव साजरा केला जातो.
हा उत्सव बघण्यासाठी इतर देशांमधून खूप पर्यटक स्पेनमध्ये दाखल होतात.
दरवर्षी हा टोमाटीना उत्सव बघण्यासाठी स्पेनमध्ये 20 ते 22 हजार पर्यटक दाखल होतात, यामधून स्पेनला बक्कळ कमाई मिळते.
हा टोमाटीना उत्सव स्पेनच्या पूर्व किनारी वसलेल्या बुनोल या छोट्याशा गावांमध्ये साजरा केला जातो.
हा टोमाटीना उत्सव ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी साजरा केला जातो.
प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव
या उत्सवाचा नेमका इतिहास अजून पर्यंत उपलब्ध नाही तरीपण लोकांच्या अख्यायिका आहेत की परेड चालू असताना दोन मुले खूप भांडत होती. नंतर त्या भांडणाचे रुपांतर हाणामारी मध्ये झाली मग नंतर ते एकमेकांना टोमॅटो फेकून मारू लागले आणि नंतर भांडण संपले तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो.
तर काही सांगतात एका कार्यक्रमात एका गायकाने निकृष्ट दर्जाचे गायन केले नंतर लोकांनी त्याच्यावर टोमॅटो फेकून मारायला सुरुवात केली .
तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो.
काही कालांतराने नंतर या उत्सवावर बंदी आणण्यात आली कारणे तसेच होते म्हणा टोमॅटो खूप प्रमाणात वाया जायची.
पण काही काळाने ती बंदी उठवण्यात आली.
2013 पासून हा उत्सव बघण्यासाठी व सहभागी होण्यासाठी याच्यावरती तिकीट आकारले गेले तिकिटाची किंमत होती बारा डॉलर एवढी होती.
भारतामध्ये या Tomatina Festival उत्सवा बद्दलची माहिती जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामुळे सर्वांपर्यंत पोहोचले.
पण 2020 साली आलेल्या कोरोंना च्या पार्श्वभूमीवर हा उत्सव रद्द करण्यात आला आहे